पार्थ पवारांना हिणवताच राष्ट्रवादीचा पहिला पलटवार, ‘राहुल गांधींच्या नेतृत्त्वामुळे काश्मीरपासू
Parth Pawar Congress: बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केल्यानंतरही आकाश मोरे यांना सुनेत्रा पवार यांच्याविरोधात रिंगणात उतरवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं दिसून येत आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन बारामती पोटनिवडणुकीत (Baramati Bypoll 2026) पाठिंबा देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडने बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवला होता. काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यांनी काँग्रेस (Congress) पक्षाच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना ही काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात असल्याची टिप्पणी केली होती. पार्थ पवार यांच्या या टीकेला महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करुन प्रत्युत्तर दिले.(Maharashtra Politics news) त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस सुरज चव्हाण यांनी देखील काँग्रेससह राहुल गांधींवरती टीका केली आहे.
Suraj Chavan : राहुल गांधी यांनी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत काय केलं
आमच्या नेत्यावर टीका करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत काय केलं ते आधी काँग्रेसने पहावं. महाराष्ट्राची परंपरा आहे, निधनानंतर त्याच घरातील व्यक्ती पोटनिवडणुकीत लढत असेल तर बिनविरोध करणे मात्र काँग्रेसने ती परंपरा पाळली नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस सुरज चव्हाण यांनी देखील काँग्रेससह राहुल गांधींवरती टीका केली आहे.
बारामती विधानसभा मतदार संघ हा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये होता, अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार यांच्या पक्षाने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याच ठिकाणी काँग्रेसने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राची राजकीय परंपरा हीच राहिलेली आहे की एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचा निधन झालं तर त्यांच्या कुटुंबातील एखादा सदस्य निवडणूक लढत असेल तर बिनविरोध करून देण्याची परंपरा राहिलेली आहे.राजकीय परंपरेला छेद देण्याचा काम काँग्रेसने केलेला आहे. महाराष्ट्राची जनभावना हीच आहे की बारामतीतील निवडणूक बिनविरोध व्हावी. परंतु जनभावनेपासून दूर गेलेली काँग्रेस निवडणूक लढवण्यासाठी ठाम आहे, म्हणून पार्थ पवार यांनी काल म्हटलं होतं की यानंतर काँग्रेसच डाऊन फॉल सुरू होईल कारण काँग्रेसचे नेते जनभावनेपासून दूर गेलेले आहेत. त्यांच्या विधानावरती प्रत्युत्तर देत असताना खालच्या पातळीवरती टीकाही केली जात आहे. कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत राहुल गांधींच्या नेतृत्वामुळे काँग्रेसची काय अवस्था झाली आहे हे काँग्रेसच्या नेत्यांनी पहावं. आमच्या नेत्यांवर अशी टीका जर केली तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ असंही सुरज चव्हाणांनी म्हटलं आहे.
Nana Patole On Parth Pawar: पार्थ पवार आमच्यापेक्षा वयाने लहान
माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, खरंतर निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे असं त्यांचं मत आहे, त्यांच्या आईने आमच्या प्रदेशाध्यक्षांना फोन केलेला आहे. अशा पद्धतीने दबाव तंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे प्रश्न सुटणार नाहीत, त्यामुळे पार्थ पवार आमच्यापेक्षा वयाने लहान आहेत, त्यामुळे मी त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचा काही कारण नाही, असं पटोले म्हणालेत. तर पार्थ पवारांच्या काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले, ते वेळ सांगेल, कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळच सांगेल, त्यामुळे मला त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायचीच नाही.
Congress On Parth Pawar: काँग्रेसने पार्थ पवारांना दिलेलं उत्तर
महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या सोशल मिडीया एक्सवरून पार्थ पवारांचं नाव न घेता पोस्ट शेअर करत म्हटलंय की, धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं ? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने कॉंग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील. या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे ?”, असं म्हणत काँग्रेसने उत्तर दिलं आहे.
Parth Pawar news: पार्थ पवार नेमकं काय म्हणाले?
माझं कुणाशी बोलणं झालं नाही. काँग्रेसला (त्यांना) कळायला पाहिजे काय करायचं ते. त्यांच्या (काँग्रेसच्या) राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला नाही माहिती. सगळे मोठे लोक आहेत, सर्वांना माहिती आहे काय चाललंय. त्यांनी (काँग्रेसने) विचार केला असेल तर करु द्या. पण त्यांना (काँग्रेसला) नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात, हे त्यांना दिसेल, अशा शब्दात पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत थेट इशाराच दिलाय.
लोक विसरत नाहीत. जे दादांचं प्रेम आहे लोकांच्या मनात, अशावेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीने हा निर्णय घेणे, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागतं. आम्ही सामोरं जाऊ, आम्ही काही कुणाला फोन करणार नाही, जे काही नशिबात लिहिलं आहे, ते बघू काय व्हायचंय ते. फक्त मला वाईट वाटतंय की काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे, असेही पार्थ पवार यांनी म्हटलं.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.