IND vs ENG; रवींद्र जडेजा वनडे मालिकेत रचणार इतिहास, करणार हा भीमपराक्रम..!
भारत आणि इंग्लंडमधील टी20 मालिकेनंतर आता एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. या मालिकेत भारतीय संघाचे स्टार खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा खेळताना दिसतील. एकदिवसीय मालिकेत तीन सामने खेळले जातील. अशा परिस्थितीत भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी करण्याची चांगली संधी आहे. कर्णधार रोहित आणि संघ व्यवस्थापनाला या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी योग्य संघ संयोजन शोधायचे आहे. रवींद्र जडेजाला एकदिवसीय मालिकेतच दोन मोठे विक्रम करण्याची संधी आहे.
रवींद्र जडेजाने आतापर्यंत भारतीय संघासाठी 197 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 220 विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामध्ये त्याने दोनदा फाईव्ह विकेट्स हाॅल घेतल्या आहेत. आता जर त्याने एकदिवसीय मालिकेत आणखी दोन विकेट्स घेतल्या तर तो सर्वाधिक एकदिवसीय विकेट्स घेण्याच्या बाबतीत टिम साउथीला मागे टाकेल. साउथीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 221 विकेट्स घेतल्या आहेत.
दुसरीकडे, रवींद्र जडेजाने आतापर्यंत भारतीय संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 197 सामने खेळले आहेत. आता जर त्याला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील प्रत्येक सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले तर तो भारतासाठी 200 एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम करेल. तो भारतासाठी 200 किंवा त्याहून अधिक एकदिवसीय सामने खेळणारा 15वा खेळाडू ठरेल. सचिन तेंडुलकरने भारतीय संघासाठी सर्वाधिक 463 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
रवींद्र जडेजाने 2009 मध्ये भारतीय संघासाठी एकदिवसीय पदार्पण केले. यानंतर, त्याने आपल्या दमदार कामगिरीने संघात कायमचे स्थान मिळवले. तो 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. त्याने आतापर्यंत 197 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2756 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 13 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 220 एकदिवसीय विकेट्सही घेतल्या आहेत.
हेही वाचा-
युनिव्हर्स बॉस पुन्हा क्रिकेट मैदानात परतणार, या टी20 स्पर्धेत खेळणार!
रोहिराट किती महिन्यांनी खेळणार वनडे सामना? शेवटच्या सामन्यात कामगिरी कशी?
IND vs ENG; रिंकू, हर्षितने नाही तर ‘या’ खेळाडूने जिंकला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणांचे पदक!
Comments are closed.