एनडीए सीट वाटप जवळजवळ अंतिम केले

बिहारमध्ये भाजप-संजदमध्ये बैठक : नितीश अन् अमित शाह यांचा फॉर्म्युला

वृत्तसंस्था/पाटणा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पाटण्यात संजद, भाजपच्या राज्यस्तरीय नेतृत्वादरम्यान बैठक झाली. गुरुवारी झालेल्या या बैठकीतील चर्चेविषयी दोन्ही पक्षांनी माहिती दिली नसले तरीही रालोआचे विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला  निश्चित झाल्याचे समजते. संजद, भाजप आणि अन्य घटक पक्षांना देण्यात येणाऱ्या जागांच्या संभाव्य संख्येवर चर्चा झाली.

अमित शाह हे डेहरी आणि बेगूसरायमध्ये भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र देण्यासाठी दोन दिवसीय दौऱ्यानुसार बुधवारी रात्री पाटणा येथे दाखल झाले होते.  गुरुवारी सकाळी शाह यांनी नितीश कुमार यांची भेट घेतली. नितीश कुमारांसोबत यावेळी संजदचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा आणि राज्याचे मंत्री विजय चौधरी उपस्थित होते. तर संबंधित हॉटेलमध्ये पूर्वीच भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, प्रदेशाध्यक्ष दिलिप जायसवाल, माजी प्रदेशाध्यक्ष संजय जायसवाल, प्रदेश संघटन महासचिव भीखूभाई दलसानिया देखील उपस्थित होते.

नितीश कुमार आणि शाह यांच्या बैठकीदरम्यान दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित राहिल्याने जागावाटपाचा अजेंडा चर्चेत राहिला असल्याची शक्यता आहे. संजद आणि भाजप प्रत्येकी कमीतकमी 100 जागा स्वत: लढू इच्छित आहे, अशास्थितीत 42 जागा शिल्ल्क राहणार असून चिराग पासवान, जीतनराम मांझी, उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षांची मागणी पूर्ण होण्याची शक्यता नाही. चिराग  यांचा लोकजनशक्ती पक्ष (रामविलास) 30-40 जागांची मागणी करत आहे. तर मांझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा 15 जागांच्या मागणीवर ठाम आहे. उपेंद्र कुशवाह हे स्वत:च्या पक्षाकरता 8-10 जागांची अपेक्षा राखून आहेत. तर मुकेश सहनी यांचा व्हीआयपी हा पक्षही रालोआत सामील होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.