Neelam Gorhe first accused Uddhav Thackeray of buying Mercedes, then summarized her own statement
ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असा खळबळजनक आरोप शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली : शिवसेनेमध्ये दोन गट झाल्यानंतर सुद्धा विधान परिषदेच्या उपसभापती आणि ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे या शिवसेना ठाकरे गटात होत्या. परंतु, त्यानंतर त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि शिंदे गटात गेल्या. त्यानंतर आता पहिल्यांदाच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असा खळबळजनक आरोप गोऱ्हे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पण त्यांनी हा आरोप केल्यानंतर काही तासांतच केलेल्या विधानाबाबत सारवासारव केली आहे. मी जे काही स्वानुभवातून सांगितले ते ओघाओघाने म्हटल्याचे शिवसेना शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हेंनी म्हटले आहे. (Neelam Gorhe first accused Uddhav Thackeray of buying Mercedes, then summarized her own statement)
दिल्लीमध्ये 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनाच्या “असे घडलो आम्ही” या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत धक्कादायक विधाने केली आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसे आणली जायची. गल्ला गोळा करण्याचे काम एकनाथ शिंदेंना देण्यात आले होते, अशी माहिती नीलम गोऱ्हेंनी दिली. गोऱ्हेंनी केलेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर “ही नीलम गोऱ्हेंची नमकहरामी आहे” असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आता हा वाद वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा… Raut Vs Shinde : ही साहित्य संमेलनातली घुसखोरी, संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
महत्त्वाची बाब म्हणजे, शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केल्यानंतर काही तासांमध्येच याबाबतची सारवासारव केली आहे. त्यांनी स्वतःच केलेल्या विधानाबाबत म्हटले की, मी जे काही बोलले ते स्वतःच्या अनुभवाच्या आधारावर बोलले आहे. या संदर्भात अजून काही वेगळे भाष्य करायचे नाही. मला काही माहीत नाही म्हणून मला भाष्य करायचे नसून मला मुद्दाम काही वाद वाढवायचाही नाही. कारण मी जे काही सांगितले ते मी ओघात सांगितले आहे. एकनाथ शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून परीश्रम करत असतानाही शिवसैनिक म्हणून त्यांच्याबाबत पुरेशी माहिती जात नाहीये, असे मला वाटल्याने मी भेटीच्यासंदर्भातील वस्तुस्थिती मांडलेली आहे, असे स्पष्टीकरण गोऱ्हेंकडून देण्यात आले आहे.
तसेच, स्वःनुभव म्हणजे स्वतःचा अनुभव, स्वः अधिक अनुभव म्हणजेच मला नीलम गोऱ्हेला आलेला अनुभव असे सांगत त्या म्हणाल्या की, मंत्रिपद हा विषय फार वेगळा आहे. मी आमदार झाले तेव्हा कधीही कल्पना केली नव्हती की मी उपनेता होईल. उपनेता झाले तेव्हा कधीही कल्पना केली नाही की प्रवक्ता होईल. कारण ज्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी चार प्रवक्तांच्या नावांची यादी टाकली त्यावेळी त्यातील एक प्रवक्ता मी होते. मी विशेष हक्क समितीची प्रमुख झाले, प्रतोद झाले, उपसभापती झाले, तेव्हाही मला याबाबत काही माहीत नव्हते. मी लॉबिंग करून किंवा न करता काहीही मिळवलेले नाही. शिवसेना प्रमुखांनी जो माझ्यावर विश्वास टाकला, त्यावेळी मी ती जबाबदारी पार पडली, असेही यावेळी नीलम गोऱ्हेंनी सांगितले.
Comments are closed.