नीलम शिंदेंच्या कुटुंबाला अखेर व्हिसा मंजूर

हिंदुस्थानी महिला नीलम शिंदे यांच्या कुटुंबाला अमेरिकेकडून आपत्कालीन व्हिसा मंजूर करण्यात आला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर हा व्हिसा मंजूर करण्यात आला असून नीलम यांच्या वडिलांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे आपत्कालीन व्हिसासाठी अर्ज केला होता. अमेरिकेतील कॅलिफोर्नियात नीलम शिंदे (35) यांना कारने जोरात धडक दिली. या अपघातानंतर त्या कोमात गेल्या आहेत, तर आरोपी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. नीलम या महाराष्ट्रातील सातारा जिह्यातील रहिवासी असून गेल्या चार वर्षांपासून त्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. नीलम यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झाले असून डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी कुटुंबीयांकडून परवानगी मागितली आहे. नीलमची काळजी घेण्यासाठी कुटुंबाचे तेथे असणे महत्त्वाचे आहे.

Comments are closed.