नीरज चोप्रा झाला लेफ्टनंट कर्नल..! आता किती असणार पगार? जाणून घ्या एका क्लिकवर
भारताचा स्टार भालाफेकपटू तसेच ‘गोल्डन बाॅय’ नीरज चोप्राला (Neeraj Chopra) यांना प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल पद देण्यात आले आहे. नीरज चोप्रा हा पूर्वी भारतीय सैन्यात नायब सुभेदार म्हणून होता. लेफ्टनंट कर्नल झाल्यानंतर नीरज चोप्राला भारतीय सैन्यात बढती देण्यात आली आहे. यासोबतच त्याच्या पगारात देखील वाढ झाली आहे.
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नलनंतर भारतीय सैन्याकडून चांगला पगार मिळेल. इंडियन डिफेन्स अकादमीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल यांना 1,21,200 ते 2,12,400 रुपयांपर्यंत पगार मिळतो. भारतीय सैन्याची ही वेतन रचना 7 व्या वेतन आयोगावर आधारित आहे.
नीरज चोप्रा हा केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील भालाफेकीतील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. एनडीटीव्ही स्पोर्ट्सनुसार, लेफ्टनंट कर्नल होण्यापूर्वी नीरज चोप्राची एकूण संपत्ती 37 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. नीरजचे वार्षिक उत्पन्न 4 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. नीरज चोप्रा आंतरराष्ट्रीय खेळांमधून तसेच जाहिरातींमधून भरपूर पैसे कमवतो. ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राला अनेक प्रोडक्टचा ब्रँड अॅम्बेसेडर देखील बनवण्यात आले आहे.
नीरज चोप्राने (Neeraj Chopra) ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदके तसेच रौप्यपदके जिंकली आहेत. नीरजने 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. त्याच वेळी, नीरजने 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येही रौप्यपदक जिंकले आहे. नीरजने ऑलिंपिकमध्ये सलग 2 पदके जिंकून इतिहास रचला आहे.
Comments are closed.