‘नीट’ फेरपरीक्षेत टॉपर मात्र गुणवत्ता यादीत नावच नाही,  ‘एनटीए’चा भोंगळ कारभार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘नीट-यूजी’च्या फेरपरीक्षेच्या निकालातही मोठा गोंधळ झाल्याचे उघडकीस येत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये तफावत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. लुधियानाची एक मुलगी चक्क संयुक्त टॉपर आहे, मात्र तिचे नाव गुणवत्ता यादीत नाही, अशी तक्रार तिने केली आहे.

समिरन राणी असे या मुलीचे नाव आहे. तिने ‘नीट-यूजी’ फेरपरीक्षेत ऑल इंडिया रँक 1 आल्याचा दावा केला आहे. तिचे गुण टॉपर आर्यन गुप्ता आणि पांशुल बन्सल यांच्याएवढेच 720 पैकी 715 असे गुणपत्रिकेवर लिहिलेले आहेत, मात्र गुणवत्ता यादीत तिचे नाव नाही. तिने तिचा निकालदेखील दाखवला. सिमरन म्हणाली की, वेबसाईटवर निकाल जाहीर झाला तेव्हा पहिल्या दोन वेळा तपासल्यावर 715 गुण दिसले. तिने याचा स्क्रीनशॉटदेखील घेतला, पण तिसऱ्यांदा तपासताच निकाल अचानक दिसणेच बंद झाले. त्यानंतर अनेक वेळा तपासले, पण वेबसाईटवर काहीही दिसले नाही. यासंदर्भात समाधान न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

Comments are closed.