नेहा बोराचा सही करण्यास नकार, अडचणी वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑल इंडिया स्टुडंटस् असोसिएशन या संघटनेची प्रमुख नेता नेहा बोरा हिने शांतता बाँडवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. याच बँडवर तिची सुटका करण्यात आली होती. दिल्लीतील महानगर न्याय दंडाधिकारी न्यायालयाने तीन दिवसांपूर्वी तिची सुटका करताना तिला शांतता बाँडवर स्वाक्षरी करण्याचा आदेश दिला होता. तथापि, तिने न्यायालयाचा आदेश मानण्यास नकार दिल्याने तिच्यावर पुढची कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. न्यायालयाची अवमानना केल्याचा आरोप तिच्यावर लावला जाऊ शकतो, असे कायदेतज्ञांचे मत आहे. मला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शांतता बाँडवर स्वाक्षरी करणे हे माझ्या आंदोलन करण्याच्या अधिकाराच्या विरोधात आहे. विरोधाला कोणताही विरोध केला जाऊ शकत नाही. कारण तो प्रत्येकाचा अधिका आहे, अशी कारणे तिने स्पष्ट केली. तिने शांतता बाँडला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तथापि, तिची आव्हान याचिका उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी फेटाळली.

Comments are closed.