मुंबईकरांना पारंपरिक दशावतार पाहण्याची संधी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोकण आणि गोव्याच्या मातीत रुजलेली, सुमारे सात-आठशे वर्षांची परंपरा लाभलेली ‘दशावतार’ ही लोककला आजही तितक्याच उत्साहाने जपली जाते. भगवान विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित हे लोकनाटय़ जत्रा-उत्सवांचे प्रमुख आकर्षण ठरते. पौराणिक कथांच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि धार्मिक-सांस्कृतिक शिक्षण देण्याचे महत्त्वाचे कार्य दशावतारातून घडत आले आहे. देवगड, वेंगुर्ले, मालवण आणि सिंधुदुर्ग परिसरात ही कला विशेष लोकप्रिय आहे.

गावागावातील जत्रा म्हणजे दशावतारी कलाकारांसाठी आपली कला सादर करण्याचे हक्काचे व्यासपीठ. पूर्वी मोजक्याच दशावतारी पंपन्या अस्तित्वात होत्या; मात्र आज अनेक नव्या मंडळांची भर पडल्याने ही कला अधिक लोकाभिमुख होत आहे.

याच पारंपरिकतेचा आणि अस्सलतेचा अनुभव आता मुंबईकरांना घेता येणार आहे. वेंगुर्ल्यातील मोचेमाड गावच्या नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोकनाटय़ मंडळातर्फे वरळी येथील नेहरू सेंटर सभागृहात शुक्रवार, 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता ‘नील माधव’ हा रंगतदार खेळ सादर होणार आहे. या कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेशिका 10 एप्रिलपासून नेहरू सेंटरच्या तिकीट खिडकीवर उपलब्ध असणार आहेत

Comments are closed.