क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच! नेपाळनं वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला टी20 विजय नोंदवला
टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच, नेपाळ आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना झाला. शारजाह क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात नेपाळने वेस्ट इंडिजचा 19 धावांनी पराभव करत मोठा धक्का दिला. यासह, नेपाळने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. वेस्ट इंडिज अकील हुसेनच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. प्रथम फलंदाजी करताना नेपाळने 20 षटकांत 8 गडी गमावून 148 धावा केल्या. प्रत्युत्तरात, वेस्ट इंडिज २० षटकांत ९ गडी गमावून फक्त 129 धावाच करू शकला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेपाळची सामन्याची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या षटकापासून संघाच्या विकेट पडू लागल्या. कुशल भुर्तेल 6 धावांवर बाद झाल्याने नेपाळला पहिला धक्का बसला. त्यानंतर यष्टीरक्षक-फलंदाज आसिफ शेख 3 धावांवर बाद झाला. रोहित पौडेल आणि कुशल मल्ला यांनी तिसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. कुशल मल्ला 21 चेंडूत 30 धावांवर बाद झाला, कर्णधार पौडेलने 35 चेंडूत 38 धावा केल्या. दीपेंद्र सिंग ऐरीनेही 19 चेंडूत 17 धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने सर्वाधिक चार बळी घेतले. नवीन बिदाईशीने 29 धावांत तीन बळी घेतले.
🚨 नेपाळने इतिहास तयार केला 🚨
– नेपाळने वेस्ट इंडिजला टीएच शारजाह येथे टी -20 सामन्यात पराभूत केले. 🙇🙇 pic.twitter.com/ni988gucuw
– तनुज (@आयमतानुजसिंग) 27 सप्टेंबर, 2025
वेस्ट इंडिजसारख्या संघासाठी 149 धावांचे लक्ष्य हे मोठे लक्ष्य नव्हते, परंतु विंडीज ते साध्य करू शकले नाही. या सामन्यात सर्व फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. सलामीवीर काइल मेयर्स पाच आणि अमीर जांगू 19 धावांवर बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अकीम ऑगस्टेने सात चेंडूत 15 धावा केल्या. त्याच्या पाठोपाठ ज्वेल अँड्र्यूने 16 धावा केल्या, तर नवीन बिदाईशीने 25 चेंडूत 22 धावा केल्या. कर्णधार अकील हुसेनने 9 चेंडूत 28धावा केल्या, पण त्यांना लक्ष्या गाठता आले नाही. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी नेपाळी गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. नेपाळकडून कुशल भुर्तेलने 17 धावांत 2 बळी घेतले.
Comments are closed.