नेपाळसाठी धोक्याची घंटा; पुन्हा एकदा फ्लॅश फ्लडची दाट शक्यता, सतर्कतेचा इशारा
नेपाळमधील पूर्व, मध्य आणि पश्चिम भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने मंगळवारी नव्याने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे; तसेच नद्यांलगत राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आणि खबरदारीचे उपाय करण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDRRMA) जारी केलेल्या सूचनेनुसार, लहान नद्या आणि नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असल्याने नुवाकोट आणि रसुवा जिल्ह्यांमध्ये फ्लॅश फ्लड येण्याची दाट शक्यता आहे.
याशिवाय पूर्व आणि मध्य नेपाळमधील ताप्लेजुंग, संखुवासभा, सोलुखुंबू, खोटांग, ओखलढुंगा, रामेछाप, डोलाखा, सिंधूपाळचोक, काव्रेपलांचोक, ललितपूर, भक्तपूर, काठमांडू आणि धाडिंग या जिल्ह्यांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याचा धोका असून फ्लॅश फ्लडचा मध्यम धोका आहे.
पश्चिम नेपाळमध्ये गोर्खा, लमजुंग, डोल्पा, रुकुम पूर्व, रुकुम पश्चिम, जाजरकोट, दार्चुला, बैतडी, डडेलधुरा, डोटी, कैलाली आणि कंचनपूर या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे प्राधिकरनाने सांगितले.
हवामानाच्या अंदाजानुसार, एनडीआरआरएमएने नदीकाठच्या आणि इतर धोकादायक भागांत राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
Comments are closed.