Nepal Helicopter Crash – नेपाळमध्ये हेलिकॉप्टरला अपघात, लँडिंगदरम्यान संतुलन बिघडले
लँडिंग करताना संतुलन बिघडल्याने हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची घटना नेपाळमध्ये घडली. हे हेलिकॉप्टर काठमांडूहून खोतांग जिल्ह्यात आले होते. यात पायलटसह एकाच कुटुंबातील पाच जण होते. हे कुटुंबीय नातेवईकाच्या अंत्यसंस्कारासाठी आले होते. अपघातात एका व्यक्तीला किरकोळ जखम झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पायलटसह सर्वजण सुखरुप आहेत. बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
सर्वांना तपासणीसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हेलिकॉप्टरने सकाळी 11 वाजता काठमांडूहून उड्डाण केले. त्यानंतर 50 मिनिटांनी खोतांग जिल्ह्यातील केपिलासगढी येथे एका शेतात लँडिंग करत असताना त्यात अचानक तांत्रिक बिघाड झाला. यामुळे हेलिकॉप्टर जमिनीवर आदळून उलटले, असे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. अपघाताबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
Comments are closed.