नेपाळ : नेपाळच्या कर्नाली प्रांतात जीप दरीत कोसळली; आठ ठार, १० जखमी

काठमांडू: नेपाळच्या कर्नाली प्रांतात शुक्रवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. रुकुम पश्चिम जिल्ह्यातील झारमारे परिसरात जीप दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला.
तर दहा जण जखमी झाले. 18 जणांना घेऊन ही जीप डोंगराळ भागात रस्त्यावरून 700 फूट खोल दरीत कोसळली.
काठमांडूपासून 500 किलोमीटर अंतरावर असलेल्या झारमारे येथे हा अपघात झाला, जीप मुसीकोटमधील खलंगा येथून अथबिस्कोटमधील स्यालिदीकडे जात असताना हा अपघात झाला.
प्राथमिक तपासात सात जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले, तर एका व्यक्तीचा स्थानिक रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींचे वय १५ ते ३० वयोगटातील आहे. उर्वरित १० जखमींवर रुकुम जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Comments are closed.