Nepal lifts social media ban – ‘जेन झी’पुढं नेपाळ सरकार नमलं; सोशल मीडियावरील बंदीचा निर्णय मागे

नेपाळ सरकारने सोशल मीडियावरील बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. सोमवारी मध्यरात्री याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. नेपाळचे दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी कॅबिनेटच्या आपत्कालीन बैठकीनंतर ही घोषणा केली.
नेपाळ सरकारने मेटा, अल्फाबेट, एक्स, इन्स्टाग्राम, यूट्यूबसह 26 सोशल मीडिया कंपन्यांना नेपाळच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणी करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली होती. मात्र या कंपन्यांनी ती पाळली नाही. त्यानंतर सरकारने फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सऍपसह बहुतेक सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी आणली.
सोशल मीडियावरील बंदीमुळे ‘जेन झी’ रस्त्यावर उतरली होती. यावेळी देशभरात झालेल्या हिंसक आंदोलनात 20 जण ठार झाले होते, 400 हून अधिक जखमी झाले. तरुणांच्या उग्र आंदोलनाचा धसका बसलेल्या सरकारने देशभरात संचारबंदी लागू केली होती. राजधानी काठमांडूमध्ये लष्कराला पाचारण करण्यात आले असून दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले. मात्र आंदोलनाची धग कमी झाली नव्हती. आगामी काळात हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता पाहता सरकारने नमते घेत सोशल मीडियावरील बंदीचा निर्णय मागे घेतला.
राजीनामा न देता एका दिवसात 19 निदर्शकांनी ठार मारल्यानंतर नेपाळ सोशल मीडियावर बंदी घालते
वाचा @ानी कथा | https://t.co/mrotmexwav#Nepal #सोशलमेडिया #प्रोटेस्ट pic.twitter.com/o31mx2antb
– दोघेही डिजिटल (@ania_digital) नाही 9 सप्टेंबर, 2025
Comments are closed.