नेपाळच्या आंदोलनातील मृतांना शहिदांचा दर्जा, प्रभारी पंतप्रधान कार्की यांची घोषणा

नेपाळमध्ये ‘जेन झी’च्या आंदोलनात मृत्यू झालेल्यांना शहीदाचा दर्जा देण्याची घोषणा प्रभारी पंतप्रधान सुशीला कार्की यांनी केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची आर्थिक मदत व जखमींवर सरकारी खर्चाने मोफत उपचार केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
सुशीला कार्की यांनी रविवारी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर मीडियाशी संवाद साधला.आंदोलनकर्त्यांना त्यांनी मोठा झटका दिला. ‘नेपाळमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाची चौकशी केली जाईल. हिंसाचार करणाऱयांना आम्ही सोडणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.
सहा महिन्यांत पद सोडणार!
‘माझे सरकार केवळ संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे. देश आर्थिक संकटात आहे. आता पुनर्बांधणीसाठी काम करायचे आहे. जनतेच्या सहकार्याशिवाय ते शक्य नाही. मी फार काळ सत्तेत राहण्यासाठी आले नाही. सहा महिन्यांत निवडणुका घेण्याचा माझा विचार आहे. नव्या संसदेची पुनर्रचना झाली की मी पायउतार होईन, असे कार्की यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.