Nepal Protests – रक्तरंजीत इतिहास विसरू शकत नाही…; नेपाळच्या खेळाडूची पोस्ट चर्चेत

नेपाळमध्ये तरुणांनी सोशल मीडियावरील बंदीच्या विरोधात ठिकठिकाणी जाळपोळ, दगडफेक आणि तोडफोड सुरू केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू तर 400 हून अधिक जखमी झाले आहे. सोशल मीडियावरील बंदी उठवण्यात आली आहे. परंतु आंदोलन अद्याप सुरूच आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा सुद्धा अज्ञात स्थळी पळून गेले आहेत. अशातच आता नेपाळचा क्रिकेटपटू संदिप लामेछानेने सोशल मीडियावर भाविनक पोस्ट शेअर केली आहे.
नेपाळमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. पंतप्रधान केपी ओली शर्मा यांच घर, माजी पंतप्रधानांच घर, राष्ट्रपतींचे खासगी घर, सुप्रीम कोर्ट आणि संसदेसह अनेक ठिकाणी आंदोलकांनी जाळपोळ केली आहे. पंतप्रधान पळून गेल्यानंतर आंदोलकांनी एकच जल्लोष केला. या सर्व परिस्थिवर नेपाळचा स्टार खेळाडू संदिप लामिछानेने इन्स्टाग्रामवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला की, “हा देश, सुंदर पण वेदनेने भरलेला, जिथे आता आनंदापेक्षा अश्रू जास्त वाहत आहेत. स्वार्थाच्या भिंतीत बंदिस्त भविष्य आहे. पण आपली आशा अजूनही जिवंत आहे. आपण किती काळ गप्प राहणार? शांत राहणे आता पर्याय नाही.” असं म्हणत त्याने आंदोलनात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच हा रक्ताने लिहिलेला अद्याय इतिहास विसरू शकत नाही, असंही तो म्हणाला आहे. त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी नेपाळ आणि त्यांच्या लोकांना वाचवण्यासाठी जे काही शक्य आहे ते करा, असे अवाहन त्याने केले आहे.
Comments are closed.