नेस्लेच्या 16 हजार कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

नेस्ले कंपनीने मोठी कर्मचारी कपात करण्याचे ठरवले आहे. या कपातीत पंपनी पुढील दोन वर्षांत 16 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. कंपनीचे नवीन सीईओ फिलिप नवराटिल यांनी हा निर्णय घेतला आहे. कंपनीचे पैसे वाचवण्यासाठी कर्मचारी कपात करण्यात येणार आहे. या कपातीमुळे कंपनीचे तब्बल 1 अब्ज स्विस फ्रँक वाचवण्यात मदत मिळणार आहे. पंपनीने 2027 च्या अखेरपर्यंत 3 अब्ज स्विस फ्रँक बचत करण्याचे ठरवले आहे. हिंदुस्थानातून किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाईल, यासंबंधी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Comments are closed.