व्हाइट हाउसमधून नेतन्याहू यांचा कतारच्या पंतप्रधानांना फोन; दोहा हल्ल्यासाठी माफी मागितली

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. जानेवारी महिन्यापासून त्यांचा हा चौथा अमेरिकन दौरा आहे. लिमोझिनमध्ये व्हाइट हाऊसमध्ये आलेल्या बेंजामिन नेतान्याहू यांचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वैयक्तिकरित्या स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या भेटीदरम्यान नेतन्याहू यांनी व्हाइट हाउसमधूनच कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल-थानी यांना फोन करून दोहा येथील अलीकडील हवाई हल्ल्यासाठी माफी मागितली. हा हल्ला हामासच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला होता. ज्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायल हवाई दलाने दोहा येथे हल्ला केला होता. या हल्ल्यात हामासचे वरिष्ठ नेते खलील अल-हय्या यांचा मुलगा आणि त्यांचे सहकारी जिहाद लबादसह पाच जण ठार झाले होते.
Comments are closed.