काहीही करा, त्याला बोलवा, नेदरलँड्सची मागणी अन् ‘डुप्लिकेट अभिषेक’मुळे जगातील नंबर-1 स्टार खेळा
अभिषेक शर्मासाठी नेदरलँडची योजना : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज अभिषेक शर्मासाठी स्पर्धेची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. आपल्या पहिल्याच टी-20 विश्वचषकात तो अजूनपर्यंत एकही धाव करू शकलेला नाही. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातही तो शून्यावर बाद झाला. सलग तिसऱ्यांदा त्याला डकचा सामना करावा लागला आहे. मात्र, हे केवळ योगायोग नव्हता. नेदरलँड्सने यासाठी अत्यंत बारकाईने आणि नियोजनबद्ध तयारी केली होती.
नेदरलँड्स संघव्यवस्थापनाची अचूक रणनीती
नेदरलँड्सच्या संघव्यवस्थापनाने गुजरात क्रिकेट असोसिएशनकडे सरावासाठी डावखुऱ्या फलंदाजाची मागणी केली. त्यांच्या संघात एक पण डावखुऱ्या फलंदाज नसल्याने त्यांनी सुमारे 100 किलोमीटर दूर सराव करत असलेल्या मनन हिंगराजिया याला बोलावून घेतले. नेट सरावादरम्यान प्रशिक्षकांनी मननला स्पष्ट सूचना दिल्या, “तू अभिषेक शर्मासारखेच खेळायचे. जणू काही तू त्याचा डुप्लिकेट आहेस. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कर.”
यानंतर उजव्या हाताचा ऑफ-ब्रेक गोलंदाज आर्यन दत्त याच्याकडे चेंडू सोपवण्यात आला. त्याने मननसमोर गोलंदाजीचा सराव केला. या नियोजनाचा फायदा सामन्यात स्पष्ट दिसून आला. अभिषेक दोन चेंडू खेळल्यानंतर तिसऱ्याच चेंडूवर बोल्ड झाला.
तीन चेंडूमध्ये खेळ खल्लास….
पहिला चेंडू : भारतीय डावाची सुरुवात करताना अभिषेक स्ट्राईकवर होता. त्याच्यासमोर ऑफ-ब्रेक गोलंदाज आर्यन दत्त होता. पहिला चेंडू अभिषेकने कव्हरच्या दिशेने खेळला, मात्र धाव मिळाली नाही.
दुसरा चेंडू : दुसरा चेंडू अभिषेकने मागे सरकत कव्हर-पॉइंटकडे फटका मारला, पण पुन्हा धाव निघाली नाही.
तिसरा चेंडू : तिसऱ्या चेंडूवर अभिषेक पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात गेला, मात्र चेंडू त्याच्या बॅटला चुकवत थेट स्टंप्सवर जाऊन आदळला. अशा प्रकारे भारताने शून्यावर पहिला विकेट गमावला. अभिषेकची ही सलग तिसरी डक ठरली. नेदरलँड्सच्या अचूक नियोजनाने आणि आर्यन दत्तच्या शिस्तबद्ध गोलंदाजीने अभिषेक शर्मा पूर्णपणे जाळ्यात अडकला, हे या प्रसंगातून स्पष्ट झाले.
अभिषेक शर्माच्या नावे ‘काळा’ रेकॉर्ड
टी-20 विश्वचषकातील कारकिर्दीच्या पहिल्या तीन डावांत 0 वर बाद होण्याची नकोशी हॅट्ट्रिक अभिषेकने केली आहे. त्याच्याआधी हा विक्रम आशीष नेहराच्या नावावर होता. नेहरा आपल्या टी-20 विश्वचषक कारकिर्दीतील पहिल्या दोन डावांत शून्यावर बाद झाला होता आणि त्याला स्पर्धेत एकही धाव करता आली नव्हती. मात्र अभिषेकने हा नकोसा विक्रम आणखी पुढे नेत तीन सलग शून्यांची नोंद केली आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.