वरुण धवनच्या नव्या चित्रपटाच्या टीझरवर नेटकरी संतापले; सोशल मीडियावर केले ट्रोल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वरुण धवनचा आगामी चित्रपट ‘है जवानी तो इश्क होना है’ चा टीझर प्रदर्शित होताच, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होण्यास सुरुवात झाली. टीझरमध्ये दाखवलेल्या एआय-निर्मित मुलांवरून युझर्सनी चित्रपटाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या वादानंतर, निर्मात्यांनी स्पष्ट केले की ही केवळ एक प्रसिद्धीची कल्पना होती आणि चित्रपटात एआयचा वापर केलेला नाही.

सध्याच्या घडीला चित्रपटसृष्टीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर झपाट्याने वाढत आहे. परंतु हा प्रयोग कधीकधी फसतो आणि त्यामुळे नवे वादही जन्माला येतात. असेच काहीसे घडले वरुण धवनच्या आगामी टीझरबाबत. टीझरमध्ये दाखवलेल्या AI-निर्मित लहान मुलांमुळे सोशल मीडियावर वादाला चांगलेच तोंड फुटले आणि अनेक युझर्सनी चित्रपट निर्मात्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता, या वादानंतर निर्मात्यांनी पुढे येऊन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अधिक रंजक बनले आहे.

TV9 ने दिलेल्या वृत्तानुसार, वरुण धवनचा आगामी चित्रपट “है जवानी तो इश्क होना है” गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, ज्यामध्ये दोन मुले एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना वाटले की, चित्रपटात मोठ्या प्रमाणात एआय (AI) चा वापर करण्यात आलेला आहे. यामुळे सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू झाले. याबाबतचा वाद वाढल्यानंतर, चित्रपटाच्या टीमने स्पष्ट केले की चित्रपटात एआयचा वापर केलेला नाही. निर्मात्यांच्या मते, टीझरमध्ये दाखवलेली मुले ही केवळ एक सर्जनशील कल्पना होती. ही मुले या चित्रपटाचा भाग असणार नाही. असे वृत्त आहे की हा टीझर विशेषतः लक्ष वेधण्यासाठी तयार करण्यात आला होता.

या चित्रपटाची कथा एका लव्ह ट्रॅंगलवर आधारीत असून, निर्मात्यांनी टीझरच्या माध्यमातून ही संकल्पना वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हा प्रयोग प्रेक्षकांना फारसा रुचला नाही आणि सोशल मीडियावर एकच कल्ला सुरू झाला. यानंतर निर्मात्यांनी स्पष्ट केले की, मूळ ट्रेलरमध्ये केवळ चित्रपटाचे कलाकार आणि मूळ दृश्येच दाखवली जातील. या चित्रपटामध्ये वरुण धवनसोबत मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे दिसणार आहेत. हा डेव्हिड धवन दिग्दर्शित एक हलकाफुलका रोमँटिक कॉमेडी चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे.

Comments are closed.