‘जा हिंदी शिकून या, आम्हाला तुमची गरज नाही’, मुंबईनंतर साताऱ्यातही संतापजनक प्रकार

गेल्या काही महिन्यांपासून मुजोर परप्रांतीयांकडून मराठी भाषेचा अवमान होण्याच्या घटना वाढल्या आहेत. यातच मुंबईमधील चारकोपच्या एअरटेल गॅलरीतील प्रकरण ताजं असतानाच आता एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ साताऱ्यातील पाटना तालुक्यातील एका बँकेतील आहे. येथील कर्मकऱ्यांनी बँकेतील ग्राहकांना आपल्याला मराठी बोलता येत नाही, तुम्हीच हिंदीत बोला, असं म्हटलं जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याचा एक व्हिडीओही समोर आला. जो पाहून तुम्हालाही संताप अनावर होईल.
हा व्हिडीओ ‘मराठी एकीकरण समिती’ नावाच्या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत आपल्याला बँकेतील दृश्य दिसत असून यात एक मराठी तरुण बोलताना दिसत आहे. या व्हिडीओत या मराठी तरुणाने बँकेतील कर्मचाऱ्यांवर आरोप करत म्हटलं आहे की, “या बँकेत बहुतांश खाती ही वृद्ध मंडळींची आहेत. या वृद्धांना हिंदी बोलता येत नाही. त्यांना फक्त मराठी भाषा कळते. पण बँकेतील कर्मचारी त्यांना हिंदीमध्येच बोलण्याचा अट्टहास करत आहेत. कारण त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही.” व्हिडीओत हा तरुण पुढे म्हणाला आहे की, याबाबत बँकेतील कर्मचारीला जाब विचारला असताना त्यांनी ‘जा हिंदी शिकून या आम्हाला तुमची गरज नाही’, असं उलट उत्तर दिल्याचं या तरुणाने म्हटलं आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी यावर आपला संताप व्यक्त करत आहेत.
बँक ऑफ युपी, बिहार ?@Mahabank
ठिकाण – बँक ऑफ महाराष्ट्र
ता.पाटण, जि. सातारा#महाराष्ट्रातमराठीच@Finminindia@आरबीआय@Samant_uday
महाराष्ट्रातील बँकांत मराठीत सेवा मिळत नाहीत, कर्मचारी वाद घालून, मराठी नाही म्हणतात.राहुल शेडगे
संघटक#मराठीएकीकरणसमिती pic.twitter.com/snsacqpeyt— मराठी एकीकरण समिती – Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) मार्च 13, 2025
Comments are closed.