OnePlus इंडियामध्ये नवीन घडामोडी, मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबिन लियू यांचा राजीनामा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

OnePlus इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबिन लियू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, अशी कंपनीने अधिकृत माहिती दिली आहे. चीनमधील स्मार्टफोन कंपनीच्या जागतिक व्यवसायात सुरू असलेल्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

रॉबिन लियू यांनी 2018 मध्ये OnePlus मध्ये प्रवेश केला होता. कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,OnePlus इंडिया साठी रॉबिन यांच्या योगदानाबद्दल आम्ही आभारी आहोत. ते आता त्यांच्या वैयक्तिक आवडी-निवडी पूर्ण करण्यासाठी कंपनीतून निरोप घेत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो.”

माध्यमांच्या अहवालानुसार, लियू यांना स्काय ली यांना रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले होते. स्काय ली यांना अलीकडेच Oppo समूहात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी लियू आणि ली हे दोघेही स्वतंत्रपणे वेगवेगळ्या सब-ब्रँडचे प्रमुख म्हणून काम करत होते. कंपनीने स्पष्ट केले की, हिंदुस्थानातील OnePlus चे कामकाज पूर्ववत सुरू राहणार आहे. OnePlus इंडिया ऑपरेशन्स स्थानिक धोरणानुसार सुरू राहतील आणि व्यवसाय सातत्याने चालू राहील, असे कंपनीने म्हटले आहे.

याआधी OnePlus हिंदुस्थानच्या बाजारातून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या लियू यांनी नाकारल्या होत्या. जानेवारी 2026 मध्ये त्यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले होते की, OnePlus हिंदुस्थानातील व्यवसाय सुरळीत सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. कंपनीच्या विक्रीत घट झाल्याचेही समोर आले आहे. OnePlus ने प्रीमियम स्मार्टफोन बाजारात मजबूत सुरुवात केली होती. मात्र, Nord सिरीजमुळे मिड-प्रीमियम सेगमेंटमध्ये प्रवेश केल्यानंतर Vivo, Oppo आणि Motorola यांच्याकडून कडवी स्पर्धा मिळत आहे.

Comments are closed.