मेलबर्न टी20पूर्वी वाढली गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवची डोकेदुखी? दोन खेळाडूंच्या नावांवर चर्चा सुरू

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील (Team india vs Australia) 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. या मालिकेतील दुसरा सामना 31 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार फलंदाजी केली होती, मात्र तरीही प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.

मेलबर्नमधील सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir & Suryakumar Yadav) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दोन खेळाडूंवर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

पहिल्या टी20 सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अर्शदीप सिंगला (Arshdeep singh) संधी दिली नव्हती. भारताने त्या वेळी तीन फिरकीपटूंना संघात स्थान दिले होते. मात्र मेलबर्नमधील सामन्यात भारत केवळ दोन फिरकीपटूंसह उतरू शकतो. त्यामुळे कुलदीप यादव (Kuldeep yadav & Varun chakrawarthy) आणि वरुण चक्रवर्ती यांपैकी कोणाला बाहेर बसावं लागणार, हा मोठा प्रश्न आहे. या दोघांपैकी एकाला विश्रांती देण्यात येऊ शकते आणि त्याच्या जागी अर्शदीप सिंगला संघात संधी मिळू शकते. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये किमान एक बदल होण्याची शक्यता निश्चित दिसत आहे.

Comments are closed.