न्यू इंडिया बँक घोटाळा – दोघा आरोपींना न्यायालयीन कोठडी

‘न्यू इंडिया सहकारी बँक अपहार प्रकरणात असलेला बँपेचा महाव्यवस्थापक व लेखा विभागाचा प्रमुख हितेश मेहता तसेच बांधकाम व्यावायिक धर्मेश पौन यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. गरज पडल्यास आर्थिक गुन्हे शाखा या दोघांचाही पुन्हा ताबा घेणार आहेत.

122 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याला आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याला 70 कोटी रुपये दिल्याने मेहताने सांगितल्यानंतर पोलिसांनी पौनच्यादेखील मुसक्या आवळल्या होत्या. या दोन अटकेच्या कारवाईनंतर बँकेचे माजी सीईओ अभिमन्यू भोअन यालाही आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. मेहता आणि पौन याच्या  कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले होते, तर भोअन यांची पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपणार असून त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Comments are closed.