IPL 2025 चे नवे नियम! खेळाडू बदलण्याच्या नियमांत मोठा फेरफार

आगामी आयपीएल 2025 स्पर्धा 22 मार्च पासून सुरु होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना ईडन गार्डनच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघामध्ये होणार आहे. तत्पूर्वी 5 वेळा आयपीएल चॅम्पियन्स ठरलेली मुंबई इंडियन्सने आत्ताच संघातील दुखापती खेळाडू लिजाद विलियम्स यांच्या जागी कॉर्बिन बॉश या खेळाडूला सामील केले आहे. यानंतर बॉशला पीएसएल सोडावे लागले. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याचा विरुद्ध लीगल नोटीस लागू केली आहे. बोर्डाने दावा केला आहे की, हे नियमांचे उल्लंघन आहे हे समजणे गरजेचे आहे, की आयपीएल मधील दुखापती खेळाडूंच्या जागी नवे नियम काय आहेत. संघ कधी आणि कोणत्या परिस्थितीमध्ये खेळाडू बदलू शकते. तसेच त्यामध्ये कोणत्या अटी असतील चला तर जाणून घेऊया.

आयपीएल संघ आता बाराव्या लीग सामन्यापर्यंत दुखापती खेळाडूंना बदलू शकते, आधी हा नियम फक्त सात सामन्यांपर्यंत होता आता हा नियम पुढेही लागू करण्यात आला आहे.

त्याच खेळाडूची रिप्लेसमेंट होऊ शकते, जे खेळाडू रजिस्टर खेळाडू यादीमध्ये सामील असतील. त्याची लीग फी त्या खेळाडूपेक्षा जास्त नसणार आहे. ज्याच्या जागी तो संघामध्ये सामील होणार आहे.

बदललेल्या खेळाडूंची लीग फी उपलब्ध सत्रासाठी संघाच्या वेतन सीमामध्ये धरली जात नाही. जर बदल केलेल्या खेळाडूचा अनुबंध पुढच्या सत्रापर्यंत वाढवला गेला तर त्याची फी वेतन सीमा मध्ये पकडली जाते.

खेळाडूची दुखापत किंवा आजारपण संघाच्या बाराव्या लीग सामन्यादरम्यान किंवा त्याच्या आधीचं असायला पाहिजे.

बीसीसीआय द्वारा असणाऱ्या डॉक्टरने ही खात्री केली पाहिजे की, खेळाडूची दुखापत हंगाम संपेपर्यंत ठीक होणार आहे की नाही.

जो खेळाडू दुखापत झाल्यावर बाहेर होईल तो हंगामात पुढचा कोणता सामना खेळू शकणार नाही.

संघांना हे सुनिश्चित करावे लागेल की, खेळाडू बदलल्यानंतर संघामध्ये त्याच्या शिवाय 25 खेळाडूंपेक्षा जास्त खेळाडू नसतील.

Comments are closed.