प्रतिका रावलचा पराक्रम, ठरली वनडेत सर्वात जलद 500 धावा करणारी महिला क्रिकेटपटू
मंगळवार 29 एप्रिल रोजी त्रिकोणीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज प्रतिका रावलने इतिहास रचला आहे. वनडे क्रिकेटमध्ये सलग पाचव्या वेळा तिने 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. ती दुसरी महिला भारतीय क्रिकेटर बनली आहे, जिने वनडे क्रिकेटमध्ये सलग पाच वेळा अर्धशतक झळकावले आहे. प्रतिकाने वनडेमध्ये 500 धावा करून एक मोठा विक्रम तिच्या नावावर केला आहे.
प्रतिका रावलने स्मृती मानधना सोबत मिळून 83 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर स्मृती 54 चेंडू 36 धावा करून बाद झाली. प्रतिका रावलने तिच्या वनडे करिअरच्या 500 धावा पूर्ण करून इतिहास रचला.
प्रतिका रावलने या शानदार पारीमध्ये आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये 500 धावा पूर्ण केल्या. ती सर्वात वेगाने 500 धावा करणारी महिला खेळाडू ठरली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात सुद्धा प्रतिकाने 62 चेंडूत नाबाद 50 धावांची पारी खेळली होती, यासाठी तिला सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला होता. त्या सामन्यात भारताने 9 विकेट्सने विजय मिळवला होता. प्रतिकाने 8 डावात 500 धावा पूर्ण केल्या आहेत.
साऊथ आफ्रिका विरुद्ध प्रतिका रावलने 91 चेंडूत 78 धावा केल्या, या दरम्यान तिने एक षटकार आणि सात चौकार झळकावले.
या मालिकेआधी तिने तीन अर्धशतक आयर्लंड विरुद्ध राजकोटच्या मैदानावर झळकावले होते. प्रतिका रावलने आयर्लंड महिला संघाविरुद्ध 15 जानेवारी 2025 रोजी 154 धावांची रेकॉर्ड पारी खेळली होती. त्याआधी पहिल्या दोन सामन्यात तिने 89 आणि 67 धावा केल्या होत्या.
27 एप्रिल पासून सुरू झालेल्या या मालिकेचा अंतिम सामना 11 मे रोजी खेळला जाणार आहे. सर्व संघ बाकीच्या दोन संघांशी दोन-दोन सामने खेळतील.
Comments are closed.