सरकारचा मोठा निर्णय! आता यूजर्स UPI द्वारे हि काढू शकतील सोने कर्ज किंवा FD चे पैसे
नवीन यूपीआय नियम: सरकारने UPI वापरकर्त्यांना एका मोठी बातमी दिली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI द्वारे पेमेंट करण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता वापरकर्ते UPI द्वारे गोल्ड लोन, बिझनेस लोन आणि FD रक्कम देखील पाठवू शकतात. यासह कर्ज खाते UPI खात्याशी देखील जोडले जाऊ शकते. याद्वारे, तुम्ही पेटीएम, फोनपे, गुगल-पे सारख्या UPI अॅप्सद्वारे क्रेडिट कार्डपासून व्यवसाय कर्जापर्यंत पेमेंट करू शकाल. हा नियम 1 सप्टेंबर 2025 पासून लागू होईल. अशी माहिती पुढे आली आहे?
बँकेत न जाताही काढता येईल कर्जाची रक्कम
या नव्या नियमानुसार पेमेंटची पद्धत अधिक सोपी आणि सुरक्षित करण्यासाठी, NPCI ने अलीकडेच अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आता पुन्हा एकदा पेमेंट करण्याची व्याप्ती वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. सध्या, UPI वापरकर्ते फक्त बचत खाते किंवा ओव्हरड्राफ्ट खाते UPI शी लिंक करू शकतील आणि याद्वारेच पेमेंट करता येईल. काही RuPay क्रेडिट कार्ड देखील UPI शी जोडले गेले आहेत, परंतु त्यांची संख्या कमी आहे. आता नवीन नियमामुळे, ग्राहक बँकेत न जाता गोल्ड लोन आणि पर्सनल लोनसाठी ऑनलाइन पैसे काढू शकतील.
एका दिवसात जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंत पेमेंट
UPIचे सध्याचे नियम P2M मनी ट्रान्सफरला परवानगी देतात, परंतु नवीन नियम लागू झाल्यामुळे, तुम्ही P2P तसेच P2PM व्यवहार देखील करू शकाल. इतकेच नाही तर तुम्ही रोख रक्कम देखील काढू शकाल. किंबहुना NPCIने यासाठी काही नियम देखील निश्चित केले आहेत. जसे की वापरकर्ते एका दिवसात जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतील.
तसेच, एका दिवसात रोख रक्कम काढण्याची मर्यादा फक्त 10,000 रुपये आहे. याशिवाय, P2P दैनंदिन व्यवहारांची मर्यादा देखील 20 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासोबतच, बँक हे देखील ठरवेल की तुम्ही UPI द्वारे कोणते पेमेंट करू शकाल. समजा तुम्ही वैयक्तिक कर्ज घेतले असेल, तर बँकेने फक्त हॉस्पिटल बिलांसाठी किंवा शाळा किंवा महाविद्यालयीन शुल्कासाठी कर्जाची रक्कम मंजूर करावी. ही सुविधा विशेषतः अशा लहान व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरेल जे 2-3 लाख रुपयांपर्यंतचे व्यवसाय कर्ज घेतात आणि त्यांना प्रत्येक वेळी पेमेंट करण्यासाठी बँकेच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.