चांदी खरेदी, ATM, मुदत ठेव ते क्रेडिट कार्डचे नियम बदलणार, 1 सप्टेंबरपासून नवे बदल लागू
सप्टेंबरपासून नवीन नियम नवी दिल्ली: 1 सप्टेंबरपासून अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. हे बदल चांदी खरेदी विक्री, स्टेट बँक क्रेडिट कार्ड, एलपीजी सिलेंडर, एटीएम व्यवहार आणि मुदत ठेव याबाबतचे नियम बदलले जाणार आहेत.
एसबीआय क्रेडिट कार्ड
1 सप्टेंबरपासून SBI क्रेडिट कार्डसंदर्भातील नियम बदलले जाणार आहेत. बिल पेमेंट, पेट्रोल आणि डिझेल खरेदी किंवा ऑनलाईन शॉपिंगसाठी अतिरिक्त शुल्क द्यावं लागू शकतं.ऑटो डेबिट व्यवहार अयशस्वी झाल्यास 2 टक्के दंड द्यावा लागेल. आंतरराष्ट्रीय व्यवहारांवार देखील अधिक चार्ज द्यावा लागेल. रिवॉर्ड पॉइंटचं मूल्य देखील घटू शकतं.
चांदीच्या खरेदीबाबतचे नियम
सरकार आता चांदी खरेदी आणि विक्रीबाबतचे नियम कडक करण्याच्या विचारत आहे. चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग असणं अनिवार्य केलं जाऊ शकतं. यामुळं चांदीची शुद्धता आणि किंमतीबाबत पारदर्शकता वाढेल. गुंतवणूकदार आणि खरेदीदारांना चांदी खरेदी करताना अधिक रक्कम द्यावी लागू शकते.
एलपीजीचे दर
दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलेंडरच्या दर्यात बदल केले जातात. 1 सप्टेंबरला एलपीजी सिलेंडरचे दर वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. सिलेंडरचे दर कमी झाल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो आणि जर दर वाढले तर खर्च वाढू शकतो.
मुदत ठेवीवरील व्याज दर
बँकेच्या मुदत ठेवींवरील व्याज दरात देखील बदल होऊ शकतात. सध्या मुदत ठेवींवर 6.5 ते 7.5 टक्के व्याज मिळतंय. पुढील काळात त्यामध्ये कपात केली जाऊ शकते. मुदत ठेव म्हणून पैसे ठेवायचे असल्यास लवकर गुंतवणूक करणं फायद्याचं ठरु शकतं.
एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भातील नियम
काही बँका एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भातील नवे नियम लागू करण्याच्या तयारीत आहेत. निश्चित व्यवहारांपेक्षा अधिक वेळा एटीएममधून पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क द्यावं लागेल. डिजिटल व्यवहार करणं फायदेशीर ठरु शकतं.
आणखी वाचा
Comments are closed.