1 नोव्हेंबरपासून बदलणार 5 मोठे नियम, तुमच्या खिशावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती
नवीन नियम: 1 नोव्हेंबर 2025 पासून महत्वाच्या नियमांमध्ये बदलहोणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. यामध्ये आधार कार्ड, बँक अकाउंट, क्रेडिट कार्ड, आणि गॅस सिलेंडरच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. बदलणाऱ्या नियमांबद्दल जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
१) आधार कार्ड
पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम आधार कार्डबाबत आहे. आता तुम्हाला नाव, पत्ता, जन्म तारीख किंवा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल, तर आधार केंद्रावर जायची गरज नाही! सगळं काही ऑनलाईन करता येणार. UIDAI आता तुमची माहिती PAN कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्डसारख्या सरकारी डेटाबेसला आपोआप चेक करेल. म्हणजे, कागदपत्रं मॅन्युअली अपलोड करण्याची झंझटच संपली. फक्त फिंगरप्रिंट किंवा डोळ्यांचा स्कॅन करायचा असेल, तरच केंद्रावर जावं लागेल. बाकीचं काम घरात बसून होईल!
२) SBI क्रेडिट कार्ड बदला
जर तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर हा नियमामुळे तुमचा खिसा थोडा हलका होऊ शकतो. Unsecured कार्डवर आता 3.75 टक्के चार्ज लागेल. यासोबत CRED, CheQ, Mobikwik सारख्या थर्ड पार्टी ॲप्समधून जर तुम्ही शाळा-कॉलेजची फी भरली, तर 1 टक्के एक्स्ट्रा चार्ज लागणार. पण, जर तुम्ही थेट शाळेच्या वेबसाइटवरुन किंवा त्यांच्या मशीनवर पेमेंट केलं, तर कोणताही चार्ज नाही. यासोबत 1,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम वॉलेटमध्ये लोड केली, तरी 1 टक्के शुल्क लागेल.
3) बँक नॉमिनीत बदल
बँक आणि लॉकरच्या नियमात मोठा ‘मास्टरस्ट्रोक’ झाला आहे. आता बँक अकाउंट, लॉकर आणि सेफ कस्टडीसाठी चार (4) लोकांना नॉमिनी बनवू शकता. आधी फक्त एकाच व्यक्तीला नॉमिनी करता यायचं. पण आता तुम्ही ठरवू शकता, की कोणाला किती हिस्सा द्यायचा.
4 ) म्युच्युअल फंडाबद्दल
तुम्ही जर शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल, तर SEBI (सेबी) ने नियम कडक केले आहेत. AMC (ॲसेट मॅनेजमेंट कंपनी) चे मोठे अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांचे नातेवाईक जर ₹15 लाखांपेक्षा जास्त व्यवहार करत असतील, तर ती माहिती कंपनीला त्यांच्या ‘वरिष्ठ अधिकाऱ्याला’ (Compliance Officer) द्यावी लागेल. याचा उद्देश एकच आहे – म्युच्युअल फंडात जास्त पारदर्शकता आणणे.
5) LPG, CNG, PNG – किंमत बदलणार
गॅसचे दरात महिन्याच्या 1 तारखेला जसा बदल होतो, तसाच LPG (गॅस सिलेंडर), CNG आणि PNG च्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे. किमती वाढतात की कमी होतात, हे 1 नोव्हेंबरला कळेल. तर मित्रांनो, 1 नोव्हेंबरपासून हे 5 मोठे नियम लागू होतील. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना जपून वापरा आणि बँक नॉमिनेशन लगेच 4 लोकांचं करून घ्या!
आणखी वाचा
 
			 
											
Comments are closed.