अकरावी प्रवेशाची माहिती मिळवा एका क्लिकवर, शिक्षण विभागाने सुरू केले व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी विद्यार्थी नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची प्रक्रीया 26 मे 2025 रोजी सकाळी 11 पासून सुरू होत आहे. त्याविषयी विद्यार्थ्यांना सर्व माहिती मिळावी यासाठी शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांच्या तर्फे अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल सुरू करण्यात आले आहे. या चॅनेलवर विद्यार्थ्य़ांना सर्व अपडेट दिले जाणार आहेत.

चॅनेलची लिंक –
https://whatsapp.com/channel/0029VBB2T6DBA1ETODYI10C

पहिल्याच दिवशी संकेतस्थळ बोंबलले

विद्यार्थ्यांना 21 मे पासून अकरावीकरिता नोंदणी आणि पसंतीच्या कॉलेजाकरिता क्रम नोंदवायचे होते. आतापर्यंत अकरावीचे प्रवेश विभागीय स्तरावर होत होते. परंतु, यंदा राज्यातील तब्बल 20 लाख 43 हजार जागांकरिता केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (कॅप) राबविली जात आहे. मात्र, सकाळीच वेबसाईट क्रॅश झाली. शालेय शिक्षण विभागाच्या नावाने बोटे मोडत लाखो विद्यार्थी, पालक कामधंदे सोडून दिवसभर वेबसाईट रिफ्रेश करत होते, परंतु रात्री उशिरापर्यंत संकेतस्थळ बंदच राहिल्याने राज्यातील लाखों विद्यार्थी-पालकांचा जीव टांगणीला लागला होता.

Comments are closed.