IND vs NZ: नाणेफेक न्यूझीलंडच्या बाजूने; निर्णायक सामन्यात टीम इंडियामध्ये बदल, नवख्या खेळाडूला संधी
IND vs NZ: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला रविवार, 11 जानेवारी रोजी सुरुवात झाली. मालिकेतील दुसरा सामना आज, बुधवार, 14 जानेवारी रोजी राजकोटमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात किवी संघाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ टीम इंडिया पहिल्या डावात फलंदाजी करताना पाहायला मिळेल.
वाॅशिंग्टन सुंदरच्या दुखापतीमुळे भारतीय संघात एक बदल करण्यात आले आहे. त्याच्या जागी आयुष बदोनीचा संघात समावेश करण्यात आला आहे. पण दुसऱ्या वनडे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही. नितीशकुमार रेड्डीला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. भारताला मालिका जिंकण्याची संधी आहे, तर न्यूझीलंड मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल. यामुळे हा सामना मनोरंजक बनला आहे.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
न्यूझीलंड – डेव्हन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅकरी फॉल्क्स, जेडन लेनॉक्स, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन
भारत- रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
Comments are closed.