IND vs NZ: दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडचा भारतावर 7 विकेट्सने विजय! मालिका 1-1 ने बरोबरीत

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. 11 जानेवारीपासून या मालिकेची सुरुवात झाली असून राजकोटमध्ये दुसरा वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव करत 7 विकेट्सने सामना जिंकला आहे. सामन्याच्या दरम्यान न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज डॅरिल मिचेलने विराट कोहली आणि केएल राहुलला मागे टाकले आहे. तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. दुसऱ्या वनडेपूर्वी विराट कोहली नंबर 1 होता, तर केएल राहुल शतक झळकावल्यानंतर टॉपवर आला होता. आता या दोघांनाही डॅरिलने मागे टाकले आहे. एवढेच नाही, तर त्याने राजकोट वनडेत शतकही ठोकले.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेत डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. विराट कोहलीने दोन सामन्यांत 116 धावा केल्या, तर केएल राहुलने 141 धावा केल्या होत्या. डॅरिल मिचेल 57 धावा करताच राहुलच्या पुढे निघून गेला. पहिल्या सामन्यात त्याने 84 धावा केल्या होत्या. दुसऱ्या वनडेतही डॅरिलची बॅट चांगलीच तळपली. त्याने 7 चौकार आणि 2 षटकार खेचत 96 चेंडूत आपले धडाकेबाज शतक पूर्ण केले. मिचेलने न्यूझीलंडला पुनरागमन करण्यास मदत केली.

डॅरिल मिचेलची भारताविरुद्धची कामगिरी नेहमीच शानदार राहिली आहे. त्याने पहिल्या सामन्यात 84 धावा करून भारतीय संघाचे टेन्शन वाढवले होते. आता दुसऱ्या सामन्यात जिथे कीवी संघासाठी 285 धावांचे लक्ष्य पहाडासारखे वाटत होते, तिथे मिचेलने विल यंगसोबत मिळून उत्कृष्ट भागीदारी केली. मिचेलने आपली खेळी मोठी केली आणि शतक झळकावत 117 चेंडूत 131 धावा केल्या. याच्या जोरावर आता न्यूझीलंडने शानदार विजय मिळवला आहे.

Comments are closed.