न्यूझीलंडने इतिहास रचला; पहिल्यांदाच जिंकली हिंदुस्थानमध्ये वन डे मालिका, विराट कोहलीची शतकी झुंज अपयशी
प्रमुख गोलंदाज आणि फलंदाजांच्या अनुपस्थितीमध्ये खेळणाऱ्या पाहुण्या न्यूझीलंडने इतिहास रचला आहे. न्यूझीलंडने हिंदुस्थानमध्ये पहिल्यांदाच वनडे मालिका जिंकण्याचा कारनामा केला. रविवारी इंदूरच्या होळकर क्रिकेट मैदानावर झालेल्या निर्णायक लढतील न्यूझीलंडने हिंदुस्थानचा 41 धावांनी पराभव केला आणि मालिका 2-1 अशी जिंकली. हिंदुस्थानकडून विराट कोहली याने शतकी (124 धावा) खेळी करत एकाकी झुंज दिली. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 338 धावांचा पाठलाग करताना शुभमन गीलच्या नेतृत्वाखाली खेळणारा हिंदुस्थानचा संघ 296 धावांमध्ये गारद झाला.
विराट कोहलीच्या शानदार कामगिरीवर न्यूझीलंडने मात करत वनडे मालिका २-१ ने जिंकली.
#INDvNZ
: https://t.co/MRZ6l9RU7y pic.twitter.com/pk5NXiI0ik
— ICC (@ICC) 18 जानेवारी 2026

:
Comments are closed.