न्यूझीलंडचा कसोटी इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय, 67 वर्षांचा विक्रम उद्ध्वस्त!

जिंबाब्वे आणि न्यूझीलंड (ZIM vs NZ) दोन्ही संघात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. मालिकेतील दुसरा सामना 7 ऑगस्टपासून सुरू झाला. या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत कसोटी इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय मिळवला. यासोबतच न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा तब्बल 67 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. न्यूझीलंडकडून 3 फलंदाजांनी 150+ धावांची खेळी केली, तर मॅट हेन्री आणि जॅकरी फाउल्केस यांनी प्रत्येकी 5-5 विकेट्स घेतल्या.

जिंबाब्वेची पहिली खेळी- 125 धावा
पहिल्या डावात जिंबाब्वेने 48.5 षटकांत फलंदाजी करत 10 खेळाडू गमावून 125 धावा केल्या. त्यांच्या कोणत्याही फलंदाजाला अर्धशतक गाठता आलं नाही. सलामीवीर बेनेट शून्यावर बाद झाला, तर ब्रेंडन टेलरने 44 धावा केल्या. निक वेल्च आणि सीन विल्यम्स यांनी प्रत्येकी 11 धावा तर कर्णधार क्रेग एर्विनने 7 धावा केल्या. सर्व फलंदाज अपयशी ठरले आणि मोठा स्कोर उभारण्यात जिंबाब्वे अपयशी ठरला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 5 विकेट्स घेतल्या.

न्यूझीलंडची पहिली खेळी- 601/3 धावा घोषित
न्यूझीलंडने पहिल्या डावात तुफान फलंदाजी करत 130 षटकांत फक्त 3 खेळाडू गमावून 601 धावा केल्या आणि डाव घोषित केला. यामुळे त्यांना 476 धावांची प्रचंड आघाडी मिळाली. डेवॉन कॉन्वेने 245 चेंडूत 153 धावा केल्या. विल यंगने 74, जॅकब डफीने 36 धावा जोडल्या. हेन्री निकोल्सने नाबाद 150 (245 चेंडू) आणि रचिन रवींद्रने 165 (139 चेंडू) धावांची खेळी केली. रवींद्र हा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

जिंबाब्वेची दुसरी खेळी- 117 धावा
दुसऱ्या डावातही जिंबाब्वेचे फलंदाज अपयशी ठरले आणि संघ 28.1 षटकांत 117 धावांत गारद झाला. यावेळी न्यूझीलंडकडून जॅकरी फाउल्केसने 5 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडने सामना 359 धावांनी जिंकला. हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय आहे. 1958 मध्ये वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध डाव आणि 336 धावांनी विजय मिळवला होता, जो आता न्यूझीलंडने मोडला.

टेस्ट क्रिकेटमध्ये डाव आणि धावांच्या फरकाने मिळालेल्या पाच सर्वात मोठ्या विजयांची यादी.!

इंग्लंड- डाव आणि 579 धावा (ऑस्ट्रेलियाविरुद्ध, 1938)

ऑस्ट्रेलिया- डाव आणि 360 धावा (दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, 2002)

न्यूझीलंड- डाव आणि 358 धावा (जिंबाब्वेविरुद्ध, 2025)

वेस्ट इंडिज- डाव आणि 336 धावा (भारताविरुद्ध, 1958)

Comments are closed.