न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयानंतर WTC पाॅईंट्स टेबलमध्ये मोठा ट्विस्ट! भारत कितव्या स्थानावर?

एनझेड वि झिम चाचणी: न्यूझीलंडने झिम्बाब्वेला दुसऱ्या कसोटी सामन्यात हरवून आतापर्यंतचा त्यांचा सर्वात मोठा कसोटी विजय नोंदवला आहे. न्यूझीलंडने झिम्बाब्वेचा एक डाव आणि 359 धावांनी पराभव केला. (New Zealand biggest Test win) या विजयासोबत त्यांनी 2-0 ने मालिका आपल्या नावावर केली. मात्र, ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चक्राचा भाग नव्हती, त्यामुळे या विजयामुळे न्यूझीलंडला कोणतेही गुण मिळाले नाहीत. दुसरीकडे, भारताने इंग्लंडला कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात हरवून मालिका बरोबरीत संपवली आणि डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये तिसरे स्थान गाठले.

दुसऱ्या कसोटीत झिम्बाब्वेने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात झिम्बाब्वेचा संघ फक्त 125 धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 5 विकेट्स घेतल्या. त्यानंतर न्यूझीलंड फलंदाजीसाठी मैदानात उतरला. न्यूझीलंडच्या तीन खेळाडूंनी शानदार शतक ठोकले. डेवोन कॉनवेने 153, हेन्री निकोल्सने 150 आणि रचिन रवींद्रने 165 धावांची नाबाद खेळी केली. या दमदार कामगिरीमुळे न्यूझीलंडने 601 धावसंख्येवर डाव घोषित केला.

झिम्बाब्वेचा संघ दुसऱ्या डावात फक्त 117 धावांवरच गारद झाला. न्यूझीलंडकडून झॅक्री फॉउल्कसने 5 विकेट्स घेतल्या. या विजयासह न्यूझीलंडने कसोटी क्रिकेट इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय नोंदवला. न्यूझीलंडने एका डाव आणि 359 धावांनी सामना जिंकून मालिका 2-0 ने आपल्या नावावर केली. डेवोन कॉनवेला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि मॅट हेन्रीला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ निवडण्यात आले. (Matt Henry Player of the Series)

न्यूझीलंडच्या विजयाने पॉइंट्स टेबलवर कोणताही फरक पडला नाही, कारण ही मालिका डब्ल्यूटीसी चक्राचा भाग नाही. भारताने इंग्लंडविरुद्धची मालिका 2-2 अशी बरोबरी साधल्यामुळे ते आता तिसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलिया 3 सामन्यात 3 विजयांसह पहिल्या स्थानावर आहे. तर, श्रीलंका दोनपैकी एका विजयासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

इंग्लंड 5 सामन्यात 2 विजयांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. बांगलादेश 2 सामन्यात एका ड्रॉसह 5व्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज 3 सामन्यांत 3 पराभवांसह सहाव्या स्थानावर आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेने अजूनपर्यंत एकही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना खेळलेला नाही. त्यामुळे ते अनुक्रमे 7व्या, 8व्या आणि 9व्या स्थानावर आहेत.

Comments are closed.