टी-20 वर्ल्ड कप दरम्यान न्यूझीलंडच्या स्टार क्रिकेटपटूची निवृत्ती; 30 व्या वर्षी क्रिकेटला राम-राम!

आयसीसी टी-20 विश्वचषक दरम्यान न्युझीलँड क्रिकेट संघाच्या खेळाडू बद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. न्यूझीलंडची फलंदाज लॉरेन डाउन (Lauren Down) हिने वयाच्या 30 व्या वर्षी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. 2018 मध्ये न्यूझीलंडच्या संघात पदार्पण करणाऱ्या लॉरेनने आपल्या निवृत्तीच्या वेळी भावूक होत सर्वांचे आभार मानले आहेत.
“मला ‘व्हाईट फर्न्स’ (न्यूझीलंड संघ) समूहाचा भाग राहून खूप आनंद झाला. देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला माझ्या संघसहकाऱ्यांसोबत घालवलेला वेळ नेहमीच आठवेल, असे लॉरेनने म्हटले. तसेच तिने ऑकलंड क्रिकेट, तिचे प्रशिक्षक आणि टीममेट्सचेही आभार मानले आहेत.
न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक बेन सॉयर यांनी लॉरेनच्या योगदानाबद्दल तिचे कौतुक केले. ते म्हणाले की, लॉरेनने नेहमीच संघासाठी आपले सर्वस्व दिले आहे. तिचे खेळाप्रती असलेले समर्पण कौतुकास्पद आहे. मी तिला आणि तिच्या कुटुंबाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो.
लॉरेन न्यूझीलंडमधील सर्वोत्तम फील्डर्सपैकी एक मानली जात असे. तिने वनडे (ODI) क्रिकेटमध्ये 35 सामन्यात 486 धावा तर 13 टी-20 (T20I) सामन्यात 93 धावा केल्या आहेत. 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि घरगुती क्रिकेटमध्ये तिने ऑकलंड हार्ट्ससाठी 202 सामने खेळले आहेत. टी-20 मध्ये ती ऑकलंडची तिसरी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू (1,496 धावा) आहे.
लॉरेनच्या कारकिर्दीत दुखापतींनी मोठा अडथळा निर्माण केला होता. अंगठ्याच्या दुखापतीमुळे तिला 2022 चा महिला विश्वचषक आणि कॉमनवेल्थ गेम्सला मुकावे लागले होते. मात्र, 2023 च्या महिला विश्वचषकात ती संघाचा भाग होती.
Comments are closed.