कॉनवे-लॅथमचा विश्वविक्रम, न्यूझीलंड विजयाच्या उंबरठ्यावर

बे ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या न्यूझीलंड-वेस्ट इंडीज कसोटी मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्याने थरारक वळण घेतले आहे. चौथ्या दिवशी न्यूझीलंडच्या सलामीवीर डेव्हन कॉनवे आणि कर्णधार टॉम लॅथम यांनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला. दुसऱ्या डावातही दोघांनी शतके झळकावत 148 वर्षांच्या कसोटी इतिहासातील अनोखा विक्रम रचला. दोन्ही सलामीवीरांनी दोन्ही डावांत शतके ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे. कॉनवेने 139 चेंडूंत 100, तर लॅथमने 130 चेंडूंत 101 धावांची संयमी खेळी साकारली. पहिल्या विकेटसाठी 192 धावांची भक्कम भागीदारी करत त्यांनी वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांना बॅकफुटवर ढकलले. न्यूझीलंडने दुसरा डाव 306/2 वर घोषित करून विंडीजसमोर 462 धावांचे कठीण आव्हान दिले. दिवसअखेर वेस्ट इंडीज बिनबाद 43 अशी मजल मारली होती.

Comments are closed.