'या' स्टार खेळाडूची क्रिकेटमधून अचानक निवृत्तीची घोषणा…! 14 वर्षांच्या कारकिर्दीला दिला पूर्णविराम
थॅमसिन न्यूटन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सेवानिवृत्तीची घोषणा केली आहे: न्यूझीलंडची स्टार अष्टपैलू खेळाडू थॅमसिन न्यूटन हिने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ती गेल्या 4 वर्षांपासून संघाबाहेर होती आणि आता तिने आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. ती 2016च्या टी20 विश्वचषक आणि 2017च्या वनडे विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघाचा भाग होती. आता तिच्या 14 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला आहे. (Thamsyn Newton retirement)
थॅमसिन न्यूटन टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करायची. यासोबतच ती मध्यम-वेगवान गोलंदाजीही करत होती. तिने 2015 मध्ये न्यूझीलंडसाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तिचा शेवटचा सामना 2021 मध्ये खेळला होता. या काळात तिने एकूण 15 सामने खेळले, ज्यात तिने 9 विकेट्स घेतल्या आणि 22 धावा केल्या. (Thamsyn Newton stats)
थॅमसिनने वनडे क्रिकेटमध्ये 2016 मध्ये न्यूझीलंडसाठी पदार्पण केले होते. त्याच वर्षी पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यात तिने पहिल्यांदा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. त्या सामन्यात तिने 19 धावा देखील केल्या होत्या आणि तिला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळाला होता. वनडे क्रिकेटच्या 10 सामन्यांमध्ये तिने एकूण 11 विकेट्स घेतल्या आणि 57 धावा केल्या. खराब फॉर्ममुळे ती संघाबाहेर होती.
तिची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार मोठी नसली, तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने चांगली कामगिरी केली. तिने 2011-12 मध्ये वेलिंग्टनमधून आपल्या देशांतर्गत कारकिर्दीची सुरुवात केली आणि 2014 ते 2018 दरम्यान कॅंटरबरीसाठी खेळली. तिने वेलिंग्टनसोबत 4 वेळा सुपर स्मॅशचे विजेतेपदही जिंकले. ती 2017-18 मध्ये डब्ल्यूबीबीएलमध्ये पर्थ स्कॉर्चर्ससाठीही खेळली होती, जिथे तिने 14 सामन्यांमध्ये एकूण 6 विकेट्स घेतल्या होत्या. (Thamsyn Newton career)
Comments are closed.