अफगाणिस्तानने रचला इतिहास; आयसीसीमध्ये प्रथमच मोठी कामगिरी..!

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये अफगाणिस्तान संघाने एक नवा विक्रम रचला आहे. सलामीवीर इब्राहिम झद्रानच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर अफगाणिस्तानने इंग्लंडविरुद्ध 300 पेक्षा जास्त धावा केल्या. अफगाणिस्तानने 50 षटकांत 7 गडी गमावल्यानंतर 325 धावा केल्या. सलामीवीर इब्राहिम झद्रानने अफगाणिस्तानला या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने 150 पेक्षा जास्त धावांची खेळी केली. दरम्यान, कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने 40 धावा, अझमतुल्लाह उमरझाईने 41 धावा आणि मोहम्मद नबीने 40 धावांचे योगदान दिले.

अफगाणिस्तान संघाने पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत 300 पेक्षा जास्त धावा करण्याचा महान पराक्रम केला आहे. अफगाणिस्तानचा आयसीसीमधील याआधीचा सर्वोच्च स्कोअर 291/5 होता, जो 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध बनवण्यात आला होता. या सामन्यात, झद्रानने अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक नाबाद 129 धावांची खेळी केली. मात्र, त्या सामन्यात अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.

आयसीसी स्पर्धेत अफगाणिस्तानचा सर्वोच्च धावसंख्या

325/7 विरुद्ध इंग्लंड, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, लाहोरमध्ये
291/5 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2023 एकदिवसीय विश्वचषक, मुंबई
288 धावा वि वेस्ट इंडिज, 2019 एकदिवसीय विश्वचषक, लीड्स येथे
286/2 विरुद्ध पाकिस्तान, 2023 एकदिवसीय विश्वचषक, चेन्नई
284 विरुद्ध इंग्लंड, 2023 एकदिवसीय विश्वचषक, दिल्लीमध्ये

अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने सर्वाधिक धावा केल्या. झद्रानने 146 चेंडूत 12 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 177 धावा केल्या आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या करण्याचा विश्वविक्रम मोडला. यापूर्वी हा विक्रम बेन डकेटच्या नावावर होता. डकेटने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 165 धावा केल्या. डकेटने 22 फेब्रुवारी रोजी हा विक्रम केला जो 5 दिवसही टिकू शकला नाही.

अफगाणिस्तान संघ – रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, सेदिकुल्ला अटल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अझमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नूर अहमद, फजलहक फारुकी.

इंग्लंड संघ – फिल साल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जोफ्रा आर्चर, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, मार्क वूड.

हेही वाचा –
हार्दिक पांड्या-जास्मिन वालियाच्या नात्याच्या चर्चा! व्हायरल व्हिडिओने वाढवले कुतूहल
इब्राहिम झद्रानने इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक शतक करत मोडले 5 मोठे विक्रम..!
1 डासाच्या आयुष्यापेक्षा कमी वेळेत पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला

Comments are closed.