अर्जुन तेंदुलकरची नेटवर्थ किती? जाणून घ्या कमाईचे स्रोत

सचिन तेंडुलकर यांचा लाडका मुलगा अर्जुन तेंडुलकरने साखरपुडा केला आहे. 25 वर्षीय अर्जुनने आपल्या बालमैत्रीण सानिया चंडोकसोबत गुपचूप साखरपुडा केला. या खास समारंभाला दोन्ही कुटुंबातील सदस्य, काही जवळचे मित्र व नातेवाईक उपस्थित होते.

डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या अर्जुनने वडिलांप्रमाणे लहान वयापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सध्या तो गोव्यासाठी घरगुती पातळीवर क्रिकेट खेळतो. तसेच IPL मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात त्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे. अर्जुन मुंबईत पालकांसोबत आलिशान घरात राहतो, तर त्याच्या वडिलांचे लंडनमध्येही एक आलिशान घर आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, अर्जुन तेंडुलकरची एकूण संपत्ती सुमारे 22 कोटी आहे. IPL मधून त्याने सर्वाधिक कमाई केली आहे. IPL 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला बेस प्राईस 20 लाखांमध्ये घेतले. 2022 मध्ये पुन्हा 30 लाखांना विकत घेतले. गेल्या 5 वर्षांत अर्जुनने IPL मधून सुमारे 1 कोटी 40 लाख कमावले आहेत.

रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली टी20 मध्येही तो गोव्यासाठी खेळतो. घरगुती क्रिकेटमधून तो दरवर्षी सुमारे 10 लाख कमावतो. त्याची वार्षिक कमाई अंदाजे 50 लाख आहे, ज्यात 75-80% उत्पन्न IPL मधून येते.

मुंबईतील 6000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळाच्या घरात अर्जुन आपल्या वडिलांसोबत राहतो. 2007 मध्ये 39 कोटींना विकत घेतलेल्या या घराची आजची किंमत सुमारे 100 कोटी झाली आहे. तसेच सचिन तेंडुलकरकडे लंडनमध्ये लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडजवळ अपार्टमेंट असून, तिथे कुटुंबीय उन्हाळ्यात सुट्टीसाठी जातात.

Comments are closed.