BCCI चं मोठं मन, टीम इंडियाला दिली मोठी भेट! 58 कोटींचे बक्षीस जाहीर
भारतीय क्रिकेट संघाने 9 मार्च 2025 रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघासाठी 58 कोटी रुपयांच्या रोख बक्षिसाची घोषणा केली आहे.
भारतीय संघाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला. साखळी सामन्यात बांग्लादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवले आणि अंतिम फेरीत पुन्हा न्यूझीलंडवर मात केली. आशाप्रकारे भारताने 13 वर्षांनंतर पुन्हा चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकली.
टीम इंडियासाठी crores 58 कोटी रुपये बक्षीस 🚨
– बीसीसीआयने टीम इंडियासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकण्यासाठी 58 कोटींच्या बक्षिसाची घोषणा केली. 🇮🇳 🇮🇳. pic.twitter.com/ahj7kvbttp
– तनुज सिंग (@imtanujsing) 20 मार्च, 2025
बीसीसीआयच्या या उदार बक्षिसामुळे खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि निवड समितीचे सदस्य यांचा उत्साह वाढला आहे. बीसीसीआय अध्यक्ष रोजर बिन्नी यांनी संघाच्या समर्पण आणि उत्कृष्टतेची प्रशंसा करताना म्हटले की, “सलग आयसीसी खिताब जिंकणे विशेष आहे आणि हे बक्षीस जागतिक स्तरावर टीम इंडियाच्या समर्पण आणि उत्कृष्टतेची ओळख आहे.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने या स्पर्धेसाठी 59.9 कोटी रुपयांचा बक्षीस निधी ठेवला होता. त्यात विजेत्या टीम इंडियाला 20 कोटी रुपये, उपविजेत्या न्यूझीलंडला 10 कोटी रुपये, आणि उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका संघांना प्रत्येकी 4.86 कोटी रुपये मिळाले.
Comments are closed.