थोडक्यात बातम्या – मोबाईल चोर गजाआड
गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱयाला अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली. लक्ष्मीकांत राजेंद्रप्रसाद द्विवेदी असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेने चार गुह्यांची उकल करण्यात अंधेरी रेल्वे पोलिसांना यश आले आहे. वरिष्ठ निरीक्षक नितीन लोंढे यांच्या पथकातील देवकर, घाग, मयेकर, भालेराव आदींच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजवरून लक्ष्मीकांतला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी 2 लाख 9 हजार रुपये किमतीचे सात महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वृत्तपत्र विव्रेता संघातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम
बृहन्मुंबई वृत्तपत्र विव्रेता संघातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रदिनी 1 मे रोजी सायंकाळी 4 वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. बृहन्मुंबई वृत्तपत्र विव्रेता संघ, 27 बी/1, त्रिसंध्या बिल्डिंग, दादासाहेब फाळके मार्ग, दादर येथे हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष मधूसुदन सदडेकर, सरचिटणीस संजय चौकेकर यांनी दिली.
सुपरमार्केटमध्ये चोरी करणाऱ्या दोघींना अटक
चोरीच्या गुह्यात फरार असलेल्या दोन महिला बांगूरनगर पोलिसांनी अटक केली. त्या दोघींनी दीड महिन्यापूर्वी मालाड येथील सुपरमार्केटमध्ये चोरी केली होती. तक्रारदार हे एका सुपरमार्केटमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. गेल्या महिन्यात त्याने स्टॉकची तपासणी केली. त्यात काही तेलाचे डबे कमी असल्याचे दिसले. त्यामुळे तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक फुटेज पाहिल्यावर एक तरुण आणि दोन महिला याने चोरी केल्याचे उघड झाले. त्या तिघांनी मिळून चोरी केली. घडल्याप्रकरणी त्याने बांगूरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन महिलांना पोलिसांनी अटक केली. कसून चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याविरोधात दोन गुन्हे नोंद आहे.
36 वर्षांनंतर केली अटक
हत्येच्या प्रयत्नाच्या गुह्यात जामिनावर पळून गेलेल्याला बोरिवली पोलिसांनी अटक केली. राजेश सिंग असे त्याचे नाव आहे. राजेशविरोधात 1990 साली बोरिवली पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला होता. बोरिवली पोलिसांनी तपास करून राजेशला अटक केली. अटकेनंतर त्याला काही महिन्यांनंतर जामीन मंजूर झाला होता. जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. तो सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. त्याच्या विरोधात न्यायालयाने वॉरंट काढून त्याला फरार आरोपी घोषित केले. बोरिवली पोलीस त्याचा शोध घेत होते. राजेश हा वलसाड येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन सस्ते यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक सागर साळुंखे, उपनिरीक्षक प्रमोद निंबाळकर, थोरात, पवार, उगले यांच्या पथकाने तपास सुरू केला. या पथकाने राजेशला वलसाडच्या उमरग्राम येथून ताब्यात घेऊन अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
Comments are closed.