फुटबॉलचा किंग रोनाल्डो लग्न बंधनात अडकणार, 8 वर्षांचं नातं होणार कायमचं

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. पाच मुलांचा वडील असलेल्या रोनाल्डोची जोडीदार जॉर्जिना रोड्रिग्ज हिने इन्स्टाग्रामवर एक असा पोस्ट केला, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली. बऱ्याच काळापासून दोघांच्या साखरपुड्याच्या बातम्या चर्चेत होत्या आणि त्यावर जॉर्जिनाने शिक्कामोर्तब केले आहे. तिने साखरपुड्याची बातमी अधिकृतपणे जाहीर केली आहे.

पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मॉडेल जॉर्जिना रोड्रिग्ज हे मागील 8 वर्षांपासून एकत्र आहेत. 2016 मध्ये त्यांच्या डेटिंगला सुरुवात झाली. जॉर्जिनासोबत रोनाल्डोला 4 मुले आहेत. 2017 मध्ये सरोगसीद्वारे इव्हा मारिया आणि मॅटेओ यांचा जन्म झाला. त्याच वर्षी अलानाचा जन्म झाला. 2022 मध्ये बेला जन्माला आली, मात्र तिच्यासोबत जन्माला आलेल्या मुलाचा जन्मानंतर मृत्यू झाला. रोनाल्डोला एक मोठा मुलगा (रोनाल्डो ज्युनिअर) आहे, ज्याची आई कोण आहे याची माहिती सार्वजनिक नाही.

रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रोड्रिग्ज हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती आणि रोनाल्डो हातात हात घालून आहेत. जॉर्जिनाच्या हातात एक चमकणारी अंगठी आहे, जी साखरपुड्याची आहे.

इंग्लिश माध्यमांच्या अहवालानुसार, 2025 मध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोची नेटवर्थ सुमारे 1.45 अब्ज डॉलर्स आहे. रोनाल्डोचा बेस कमाई सुमारे 20 कोटी डॉलर्स आहे, तर वर्षाला सुमारे 15 कोटी डॉलर्स तो जाहिरातींमधून कमावतो. 2022 मध्ये त्याने सौदी अरेबियाच्या संघासोबत 60 कोटी डॉलर्सचा करार केला होता, जो 2027 पर्यंत वाढवण्यात आला आहे. क्लबने रोनाल्डोसोबत आणखी दोन वर्षांसाठी अंदाजे 62 कोटी डॉलर्सचा करार केला आहे.

Comments are closed.