'विराट भैय्याला मी…' हर्षित राणाचा मोठा खुलासा, जाणून घ्या कोहलीबद्दल असं काय म्हटलं की झाला व्हायरल
भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणाने खुलासा केला आहे की त्याला गेल्या वर्षी टीम इंडियाचा वरिष्ठ खेळाडू विराट कोहलीकडून गोलंदाजीबद्दल एक महत्त्वाचा सल्ला मिळाला होता, ज्यामुळे त्याची कामगिरी आणि विचारसरणी दोन्ही बदलली. त्याने एका पॉडकास्टमधील संभाषणादरम्यान हे सांगितले.
2024च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विजेत्या संघाचा महत्त्वाचा भाग असलेला हर्षित राणा अलीकडेच रणवीर अलाहबादियासोबत एका पॉडकास्टमध्ये दिसला. ज्यात त्याने 2024 मध्ये श्रीलंका दौऱ्यादरम्यान नेटमध्ये विराट कोहलीला गोलंदाजी करताना एक किस्सा सांगितला.
राणा संभाषणादरम्यान म्हणाला, “मी विराट भैयाला नेटमध्ये गोलंदाजी करत होतो. हा माझ्या कारकिर्दीचा पहिलाच दौरा होता आणि विराट भैयाने मला कधीही एकदिवसीय सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना पाहिले नव्हते. त्याने माझी लांबी पाहिली आणि म्हणाला की मी त्याच लांबीने थोडा पुढे गोलंदाजी करत आहे. त्यावेळी मी सुमारे 7-8 मीटरने गोलंदाजी करत होतो. तो नेटमधून बाहेर आला आणि मला 5-6 मीटर लांबीने गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला, यामुळे फलंदाजाला शाॅट खेळता येणार नाही. बॅटचा कट लागू शकतो.”
यादरम्यान, राणाने असेही सांगितले की विराट कोहलीने त्याची लांबी सुधारण्याचा सल्ला दोनदा पुन्हा दिला होता, जेणेकरून तो ते गांभीर्याने घेईल. तो म्हणाला, “विराट भैयाने मला दोनदा अशी गोलंदाजी करण्याची आठवण करून दिली.”
हर्षित राणाने आयपीएल 2024 मध्ये चेंडूने उत्कृष्ट कामगिरी केली. 13 सामन्यांमध्ये १९ बळी घेऊन तो केकेआरचा संयुक्त दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. 2024 च्या आयपीएलच्या त्या हंगामात केकेआरने ट्रॉफी जिंकली आणि राणाच्या गोलंदाजीने अनेक सामन्यांचा मार्ग बदलला.
गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यासाठी राणाची भारताच्या एकदिवसीय संघात निवड झाली होती आणि या वर्षाच्या सुरुवातीला त्याने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यातही पदार्पण केले होते.
Comments are closed.