थोडक्यात बातम्या – 50 लाख तरुणांना सायबर प्रशिक्षित करणार

आयबीएमने 2030 पर्यंत हिंदुस्थानातील 50 लाख विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), सायबर सिक्युरिटी आणि क्वांटम कम्प्युटिंग या क्षेत्रात प्रशिक्षण देण्याचे जाहीर केले आहे. ही योजना आयबीएम स्किल्स बिल्ड या कार्यक्रमाद्वारे राबवली जाईल. याचा उद्देश प्रगत डिजिटल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे. या उपक्रमांतर्गत आयबीएम शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक तसेच प्रशिक्षण संस्थांमध्ये एआय आणि नव्या तंत्रज्ञानाचे शिक्षण देणार आहे, असे आयबीएमचे चेअरमन अरविंद कृष्णा म्हणाले.

अखिल भारतीय महिला मराठा महासंघातर्फे वधू-वर मेळावा

अखिल भारतीय महिला मराठा महासंघ, मुंबई या संस्थेच्या वतीने मराठा समाजातील वधू-वर मेळावा नवीन, घटस्पह्टीत तसेच विधवा -विधुर यांच्यासाठी रविवार, 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत मराठा मंदिर, जिवाजीराव शिंदे हॉल, दुसरा मजला, मुंबई सेंट्रल येथे आयोजित करण्यात आलेला आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली नावे शिवनेरी सभागृह, श्री शिवाजी मंदिर, दादर पश्चिम येथे सायंकाळी 4 ते 6 या वेळेत नोंदवावी, अथवा 9930762106 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या कार्याध्यक्षा सुवर्णा पवार, सरचिटणीस नम्रता भोसले व खजिनदार स्मिता वारंग यांनी केले आहे.

पालिका निवडणुकीसाठी भाजपची वॉर रूम

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने वॉर रूम स्थापन केली असून तिचे  उद्घाटन भाजपचे अखिल भारतीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले. ‘वॉर रुम’च्या उद्घाटनानंतर मुंबई भाजप निवडणूक संचलन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला पेंद्रीय वाणिज्य आणि  उद्योग मंत्री पीयुष गोयल,  मुंबई उपनगर जिह्याचे  पालकमंत्री अॅड. आशिष शेलार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित  साटम उपस्थित होते.

Comments are closed.