थोडक्यात बातम्या – प्राधिकरण देणार स्वयंपुनर्विकासाला गती

स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी स्वतंत्र महामंडळ अथवा प्राधिकरण स्थापन करण्याची शिफारस अभ्सास गटाकडून करण्यात आली होती. त्यानुसार सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरण स्थापन केले आहे. आमदार प्रवीण दरेकर यांची या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून ते उद्या वांद्रे येथील गृहनिर्माण भवन येथे आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. या प्राधिकरणासाठी स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी वर्ग शासनाकडून प्रतिनियुक्तीवर पुरविला जाणार आहे. गृहनिर्माण विभागाच्या अधिपत्याखाली हे प्राधिकरण काम करणार आहे. या प्राधिकरणावर शासकीय आणि अशासकीय सदस्यांचीही राज्य शासनाकडून नियुक्ती केली जाणार आहे.
माजी सैनिक महामंडळ कामगार वेतनात सुधारणा
महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) यांच्याकडील सुरक्षा कामगार यांच्या वेतनातील सुधारणा करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबत सैनिक कल्याण विभागाने संबधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांची बैठक बोलवावी अशा सूचना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ यांचे सुरक्षा कामगार यांचा सुधारित वेतनाचा प्रस्ताव महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडला सादर करावा तसेच मेस्को व महाजनको तसेच संबधित अधिकारी यांची या निर्णयासाठी संयुक्त बैठक घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Comments are closed.