IND vs AUS: भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार ऑलराऊंडर खेळाडू बाहेर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. या सामन्यात शुबमन गिलचे नशीब त्याच्या बाजूने नव्हते, कर्णधार म्हणून पदार्पणाच्या मालिकेत तो सलग तिसरा टाॅस गमावला. हा भारताचा सलग 18 वा एकदिवसीय सामना आहे ज्यामध्ये संघाने नाणेफेक जिंकली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले. कर्णधार शुभमन गिलने घोषणा केली की कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णाला नितीश कुमार रेड्डी आणि अर्शदीप सिंग यांच्या जागी घेण्यात आले आहे. बीसीसीआयने आता नितीश रेड्डीला वगळण्याचे कारण उघड केले आहे.

बीसीसीआयने एक्स वर पोस्ट केले की, “अ‍ॅडलेडमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान नितीश कुमार रेड्डीला डाव्या क्वाड्रिसेप्सची दुखापत झाली आणि त्यानंतर तो तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी निवडीसाठी अनुपलब्ध झाला. बीसीसीआयची वैद्यकीय टीम दररोज त्याचे निरीक्षण करत आहे.”

शुबमन गिल नाणेफेकीनंतर म्हणाला की, “आम्हाला आधी गोलंदाजीच करायची होती. आमचा उद्देश होता त्यांना एका ठराविक धावसंख्येपर्यंत मर्यादित करणे आणि त्यांचा पाठलाग करणे. मला वाटते, जे आम्हाला हवे होते ते साध्य झाले. मागील सामन्यात आपल्याकडे चांगल्या संधी होत्या, पण त्यांचा पूर्ण फायदा आपण घेऊ शकलो नाही. क्रिकेटमध्ये असेच होते; संधी मिळाल्या तर त्याचा फायदा घ्यावा लागतो. सुमारे 40व्या षटकापर्यंत सामना बरोबरीत होता, पण अखेरीस त्यांनी चांगली कामगिरी केली. आशा आहे की हा सामना आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. दोन बदल झाले आहेत. अर्शदीप आणि रेड्डीच्या जागी कुलदीप आणि प्रसिद्ध संघात आले आहेत.”

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, अ‍ॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, नाथन एलिस, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झांपा, जोश हेझलवुड

Comments are closed.