नितीशकुमार रेड्डीचे 'पुष्पा' सेलीब्रेशन, अर्धशतक ठोकताच दाखवला 'फायर' अंदाज, पाहा VIDEO
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. तिसऱ्या दिवशी रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा या जोडीने भारताला चांगली सुरुवात करून दिली, पण खेळाच्या पहिल्या तासात आक्रमकता दाखवण्याच्या प्रयत्नात पंत 28 धावांवर बाद झाला. पंतच्या रुपाने स्कॉट बोलंडने भारताला सहावा धक्का दिला. यानंतर नॅथन लायनने रवींद्रची (17) जडेजाची शिकार केली. 7 विकेट पडल्यानंतर नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. रेड्डीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आणि भारताला फॉलोऑन टाळण्यातही यश आले.
नितीशकुमार रेड्डीने कसोटीतील आपले पहिले अर्धशतक खूप खास पध्दतीने सेलीब्रेट केले. अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जूनप्रमाणे ट्रेडमार्क सेलीब्रेशन केले. ज्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ-
नितीश कुमार रेड्डी पुष्पा उत्सवासोबत. 🥶 pic.twitter.com/9NHjpPdBpj
— मुफद्दल वोहरा (@mufaddal_vohra) 28 डिसेंबर 2024
221-7 अश्या स्थितीतून या दोघांनी शानदार फलंदाजी करत भारताला फाॅलोऑनपासून टाळले आहे. या दोघांनी या बातमीआखेरीस 66 धावांची भागीदीरी केली आहे. ज्यात नितीश रेड्डीने मेलबर्न कसोटीत त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने मिचेल स्टार्कच्या 83व्या षटकात 50 धावा पूर्ण केल्या. त्याची ही खेळी भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. रेड्डीला सुंदरकडून चांगली साथ मिळत आहे. सुंदर 29 धावांवर नाबाद खेळत आहे. तर भारत सध्या 288-7 अश्या स्थिती आहे.
हेही वाचा-
IND vs AUS: ‘मूर्खपणाची हद्द…’, रिषभ पंतच्या शाॅट सिलेक्शनवर सुनील गावस्कर संतापले
असं झालं तर… रोहित शर्मा निवृत्ती जाहीर करणार? ही बीजीटी मालिका शेवटची ठरणार!
बॉर्डर-गावस्कर मालिकेत बुमराहशिवाय इतर गोलंदाजांची कामगिरी खूपच खराब, आकडेवारी धक्कादायक!
Comments are closed.