8 वर्षांनी टीम इंडियात पुनरागमन! करुण नायर भावुक, म्हणाला…

IND vs ENG Test Series 2025: भारतीय क्रिकेट संघ येत्या 20 जून पासून इंग्लंडमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे, ज्यासाठी BCCI ने शनिवारी संघाची घोषणा केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर, करुण नायर 8 वर्षांनी भारतीय संघात परतला आहे. त्याने मार्च 2017 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला. संघात परतल्यानंतर नायरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. Karun Nair returns after 8 years In Team india

2016 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या करुण नायरने 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना खेळला. त्याच्या कारकिर्दीत, त्याने 6 कसोटी आणि 2 एकदिवसीय सामने खेळले, परंतु तो बराच काळ टीम इंडियाबाहेर होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगल्या कामगिरीनंतर, सोशल मीडियावर मागणी होती की त्याला संधी द्यावी. Social media demand देशांतर्गत क्रिकेटच्या आधारे, त्याला आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने देखील निवडले. स्पर्धेतून बाहेर पडलेल्या दिल्लीने शनिवारी, 24 मे रोजी पंजाब किंग्जविरुद्ध लीग टप्प्यातील शेवटचा सामना 6 विकेट्सने जिंकला. ज्यात करुणने 27 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 44 धावा केल्या.

सामन्यानंतर करुण नायर म्हणाला, “हे खूप छान वाटत आहे, आम्ही या विजयासाठी खरेच पात्र आहोत. स्पर्धेत आमच्याकडून काही चुकले, आम्ही आमची खरी क्षमता दाखवू शकलो नाही. पण आजच्या सामन्यात आम्ही आमचा दर्जा सिद्ध केला. काही वाईट सामने झाले, पण हा संघ खरंच चांगला आहे.”

भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाल्यानंतर करुण विशेष भावुक झाला. “परत आल्याबद्दल खूप आभारी आहे. आनंद, अभिमान आणि थोडंसं भाग्य देखील वाटत आहे. मला हे तुमच्यासारखंच माध्यमांतूनच कळलं. कॉलची मी आतुरतेने वाट पाहत होतो, आणि जवळच्या लोकांकडून खूप प्रेमाचे संदेश आले.” Karun Nair reaction after selection

नायरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं तर, त्याने 6 सामन्यांच्या 7 डावात 374 धावा केल्या आहेत. कसोटी सामन्यात नायरचा सर्वोच्च धावसंख्या 303 आहे, जो त्याने इंग्लंडविरुद्ध केला. त्याच्याकडे 2 एकदिवसीय सामन्यात 46 धावा आहेत. आयपीएल 2025 बद्दल बोलायचे झाले तर, त्याने 8 सामन्यात 198 धावा केल्या आहेत.

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या संघात समाविष्ट खेळाडू

शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.

Comments are closed.