चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघात धक्कादायक बदल, सामना फिरवणारा गोलंदाज बाहेर

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला एक-दोन नव्हे तर पाच मोठे धक्के सहन करावे लागले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी संघात चार बदल करण्याची घोषणा केली होती. परंतु आयसीसीच्या अंतिम मुदतीपूर्वी संघाने अंतिम 15 संघात पाच बदल केले आहेत. कर्णधार पॅट कमिन्ससह वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड, अष्टपैलू मिशेल मार्श आणि मार्कस स्टोइनिस आधीच बाहेर होते आणि आता अंतिम संघ जाहीर होण्यापूर्वी संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क देखील चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे.

ऑस्ट्रेलियन संघातून आधीच दोन वेगवान गोलंदाज बाहेर होते आणि आता त्या त्रिकुटातील हा तिसरा गोलंदाजही बाहेर पडला आहे. निश्चितच हा संघासाठी मोठा धक्का आहे. मिचेल स्टार्कने वैयक्तिक कारणांमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने आज बुधवारी आठ संघांच्या या स्पर्धेसाठी 15 जणांचा संघ जाहीर केला.

कर्णधार पॅट कमिन्स घोट्याच्या दुखापतीने ग्रस्त होता, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड हिपच्या दुखापतीने ग्रस्त होता आणि अष्टपैलू मिचेल मार्श पाठीच्या दुखापतीने ग्रस्त होता, तर या महिन्याच्या सुरुवातीला मार्कस स्टोइनिसने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत, संघाला आता त्यांच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करावी लागली आहे. तसेच, स्टार्कच्या संघातून बाहेर पडण्याचा अर्थ आता ऑस्ट्रेलियाला त्यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात पाच नवीन खेळाडूंचा समावेश करावा लागला आहे. शॉन अ‍ॅबॉट, बेन द्वारशीस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, स्पेन्सर जॉन्सन आणि तन्वीर संघा यांना अंतिम पंधरामध्ये स्थान मिळाले आहे. तर, कर्णधारपद स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफी संघ-

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅलेक्स कॅरी, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट आणि अ‍ॅडम झांपा

हेही वाचा-

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: टीम इंडियाचा फिरकी गेमप्लान, या 5 फिरकीपटूंना संघात स्थान
भारतीय संघाला मोठा फटका! जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर
तिसऱ्या वनडेत कोण मारणार बाजी? भारत व्हाईटवॉश करणार की इंग्लंड मान राखणार?

Comments are closed.